आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारताची युवा महिला फलंदाज आणि ‘लेडी सेहवाग’ अशी ओळख असलेल्या शफाली वर्माला फायदा झाला आहे. शफाली पुन्हा एकदा टी-२०मध्ये जगातील नंबर वन महिला फलंदाज बनली आहे. श्रीलंकेची फलंदाज चमारी अटापट्टूनेही फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्याच मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर तिने ७५४ रेटिंग गुणांसह पहिले स्थान पटकावले. मात्र, बराच काळ एकही सामना न खेळल्याने तिची रेटिंग ७२४ पर्यंत खाली आली. शफालीचे रेटिंग गुण ७२६ आहे.

३२ वर्षीय किवी खेळाडू सोफी डेव्हाईन ३७० रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या दीप्ती शर्माने एका स्थानाने प्रगती केली, आता ती तिसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी टॉप-१० मधून बाहेर पडली आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘‘गांगुलीलासुद्धा वर्ल्डकप जिंकता आला नाही…”, रवी शास्त्रींचा विराटला उघड पाठिंबा!

गोलंदाजांमध्ये इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तिचे ७६१ रेटिंग गुण आहेत. पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या दोन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shafali verma regains top spot among batters in icc womens t20i rankings adn
First published on: 25-01-2022 at 15:23 IST