भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाची कर्णधार शफाली वर्मा हिलाही मोठी बोली लागली आहे. भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारी शफाली वर्मा मालामाल झाली आहे. तिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटीला विकत घेतले आहे. तिच्याआधी स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर सर्वाधिक बोली लागल्या.

शफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले. दोन कोटींमध्ये विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीत ती सामील झाली आहे. शफाली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने अलीकडेच अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, जिथे भारतीय संघाने अंतिम फेरी विजेतेपद पटकावले होते.

शफाली वर्माची कारकीर्द –

शफाली वर्माने आतापर्यंत ५२ टी-२० सामने खेळले आहेत. जिथे तिने २४.७८ च्या सरासरीने १२६४ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५ अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय शफालीने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

टीम इंडियाची महत्त्वाची खेळाडू –

शफाली वर्मा टीम इंडियाची महत्त्वाची खेळाडू आहे. तिच्या तृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला. तेव्हापासून तिचे कौशल्य समोर आले आहे. शफाली सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-२० महिला विश्वचषकाचा भाग आहे.

महिला प्रीमियर लीग लिलावातील टॉप पाच महागडे खेळाडू –

स्मृती मंधाना, ३.४० कोटी (RCB)
नताली सायव्हर ब्रंट, ३.२० कोटी (MI)
ऍशले गार्डनर, ३.२० कोटी (GG)
दीप्ती शर्मा, २.६० कोटी (UPW)
जेमिमा रॉड्रिग्ज, २.२० कोटी (DC)