scorecardresearch

शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ

शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जुही चावलाचे पती जय मेहता यांची मालकी असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने अबू धाबी फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत.

SHAH RUKH KHAN AND UAE CRICKET
शाहरुख खान आणि यूएईमधील क्रिकेट स्टेडियम (फोटो- indianexpress.com)

अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या नाईट रायडर्स ग्रुपने आपला विस्तार केला आहे. या ग्रुपने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या फ्रेंचायझीप्रमाणे युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-२० लीगसाठी अबू धाबी फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत. युएईमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये अबू धाबी संघ आता अबू धाबी नाईट रायडर्स या नावाने सहभाही होणार आहे.

हेही वाचा >> जाडेजाने IPL सोडल्यानंतर चेन्नईच्या सीईओंनी दिली मोठी माहिती, म्हणाले “तो बाहेर पडला कारण…”

शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जुही चावलाचे पती जय मेहता यांची मालकी असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने अबू धाबी फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत. त्यानंतर आता अबू धाबी हा संघ अबू धाबी नाईट रायडर्स या नावाने ओळखला जाणार आहे. याआधी नाईट रायडर्स ग्रुपने कॅरेबियन प्रीमियर लिगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) या फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवलेले आहेत. तसेच यूएसएमधील मेजर लीग क्रिकेटमध्येदेखील नाईट रायडर्स ग्रुपने गुंतवणूक केलेली आहे.

हेही वाचा >> IPL 2022 CSK vs MI : आज मुंबई-चेन्नई आमनेसामने, सीएसकेसमोर आज ‘करो या मरो’

रायडर्स ग्रुपने फ्रेंचायझीचे मालकी हक्क मिळवल्यानंतर यूएई टी-२० लीगने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार “आम्ही नाईट रायडर्स या ब्रँडचा जागतिक पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहोत. यूएई टी-२० लीगचा एक भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नक्कीच यामध्ये आम्हाला यश मिळेल,” असे शाहरुख खानने म्हटले आहे.

हेही वाचा >> ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा रुद्रांक्षचा निर्धार ;रुद्रांक्षची १७ राष्ट्रीय स्पर्धेत आणि १२ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक कमाई

दरम्यान, युएईमध्ये आयपीएलप्रमाणेच टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहा संघ असून या संघांमध्ये ३४ सामने खेळवले जाणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khan owned knight riders group owned franchise for uae t20 cricket prd

ताज्या बातम्या