scorecardresearch

Shaheen Ansha Wedding: ‘आमचा संस्मरणीय दिवस खराब करू नका…’; लग्नानंतर भडकलेल्या शाहीन आफ्रिदीचे ट्विटरवर आवाहन

Shaheen Afridi Tweet: क्रिकेटर शाहीन आफ्रिदी शुक्रवारी विवाहबद्ध झाला. त्याने माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले. यानंतर शाहीन आफ्रिदी नाराज झाला असून त्याने ट्विटवर एक पोस्ट केली आहे.

Shaheen Ansha Wedding photo and shaheen angry
शाहिन आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा (फोटो- ट्विटर)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी शुक्रवारी विवाहबद्ध झाला. त्याने माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे शाहीन आफ्रिदी नाराज झाला आहे. शाहीनचे म्हणणे आहे की, लोकांनी त्याच्या गोपनीयतेचा आदर केला नाही. त्याने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

लग्नानंतर शाहीन आफ्रिदीचे त्याची नवीन वधू बेगम अंशासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. शाहीनला ही गोष्ट आवडली नाही. त्याने आता सोशल मीडियावर लोकांना खास आवाहन केले. शाहीनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, ”हे खूप निराशाजनक आहे की वारंवार विनंती करूनही आमच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले गेले. लोक विचार न करता ते शेअर करत राहिले. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना नम्रपणे विनंती करतो, की कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. आमचा संस्मरणीय दिवस खराब करण्याचा प्रयत्न करू नका.”

शाहीन शाह आफ्रिदीची पोस्ट

शाहीनने लग्नानंतर ट्विटरवर तीन फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये पत्नीचा चेहरा दिसत नाही. त्याने कॅप्शन लिहिले, ‘देव दयाळू आहे. शुभेच्छांबद्दल आणि आमचा खास दिवस संस्मरणीय बनवल्याबद्दल सर्वांचे आभार.

शाहीनच्या लग्नात सर्व नातेवाईकांना फोन बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. एंट्री गेटवर जारी केलेल्या सूचना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूचनांमध्ये लिहिले होते की, ‘आज तुम्ही लोक आम्हाला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट, कृपया सर्वांनी तुमचा फोन बंद करा आणि आमच्यासोबत या खास क्षणाचा आनंद घ्या.’

हेही वाचा – Saqib Mahmood Post: ‘जिहादी’ म्हटल्यावर संतापला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज; ट्रोलरला म्हणाला…, फोटो होतोय व्हायरल

त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाच्या लग्नाचे फोटो कोणी लीक केले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शाहीन आणि अंशाच्या लग्नात सहभागी झालेल्या लोकांचे काम असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यापैकीच काहींनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 14:16 IST

संबंधित बातम्या