scorecardresearch

“…म्हणून माझ्या मुलीने भारतीय ध्वज फडकवला”, शाहीद आफ्रिदीचे स्पष्टीकरण

भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान आफ्रिदीच्या मुलीने भारतीय ध्वज फडकावल्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे. तसेच तिने असे का केले याचे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे.

“…म्हणून माझ्या मुलीने भारतीय ध्वज फडकवला”, शाहीद आफ्रिदीचे स्पष्टीकरण
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

आशिया चषकात ४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना पार पडला. हा सामना शाहीद आफ्रिदीने परिवारासह दुबईतील मैदानात बसून बघतला. दरम्यान, यावेळी आफ्रिदीच्या मुलीने भारतीय ध्वज फडकावल्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे. तसेच तिने असे का केले याचे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे. सामन्यानंतर एका टीव्ही कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…”

एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना शाहीद आफ्रिदीने भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान आपल्या मुली भारतीय झेंडा फडकवल्याचे म्हटले आहे. ”मी आणि माझ्या परिवाराने भारत पाकिस्तान सामना स्टेडियममध्ये बसून बघितला. मात्र, या सामन्यादरम्यान माझ्या पत्नीने मला सांगितले की, या स्टेडियममध्ये केवळ १० टक्के पाकिस्तानी चाहते होते”, अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली आहे.

हेही वाचा – “मी बीसीसीआयचा अध्यक्ष असलो तरी…”; विराट कोहलीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं भन्नाट उत्तर

तो पुढे बोलताना तो म्हणाला, ”सामन्या दरम्यान माझ्या लहान मुलीने भारताचा झेंडा फडकवला. कारण तिला त्यावेळी पाकिस्तानी झेंडे मिळत नव्हते. त्यानंतर याचे व्हिडीओही माझ्याकडे आले. मात्र, ते शेअर करावे की नाही, याबाबत मला संशय होता.” दरम्यान, या व्हिडीओ नंतर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींनी आफ्रिदीला चांगलेच ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या