विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईचे नेतृत्व शाम्स मुलानीकडे

वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ओमान दौऱ्यावर गेलेल्या मुंबई संघाचे कर्णधारपदसुद्धा मुलानीने सांभाळले होते.

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईचे नेतृत्व शाम्स मुलानीकडे

मुंबई :आगामी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या २० सदस्यीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू शाम्स मुलानीकडे सोपवण्यात आले आहे.

एकदिवसीय क्रिकेट प्रकाराच्या या राष्ट्रीय स्पर्धेला ८ डिसेंबरपासून थिरुवनंतपूरम येथे प्रारंभ होणार असून, मुंबईचा समावेश एलिट ब—गटात करण्यात आला आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ओमान दौऱ्यावर गेलेल्या मुंबई संघाचे कर्णधारपदसुद्धा मुलानीने सांभाळले होते. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, संकटमोचक फलंदाज सिद्धेश लाड आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचा मुंबईच्या संघात समावेश केला आहे. गोलंदाजीच्या माऱ्याचे नेतृत्व अनुभवी धवल कुलकर्णीकडे असेल.

  संघ : शाम्स मुलानी (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, आकर्षित गोमेल, सागर मिश्रा, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, साईराज पाटील, अमन खान, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे, अतिफ अत्तरवाला, दीपक शेट्टी आणि परिक्षित वळसंगकर.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताकडून कॅनडाचा १३-१ असा धुव्वा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी