scorecardresearch

Shane Warne Died : शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा ; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सेहवागसह अनेकांकडून शोक व्यक्त

शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता.

(संग्रहीत छायाचित्र)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या महान क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून, अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटू शोक व्यक्त करत आहेत.

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

धक्कादायक, स्तब्ध आणि मन्न सुन्न करणारे… – सचिन तेंडुलकर

“ धक्कादायक, स्तब्ध आणि मन्न सुन्न करणारे… वॉर्नी तुझी आठवण येईल. तू आजूबाजूला असताना मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळा आला नाही. तुझा खेळकर स्वभाव खूपच मस्त होता. मैदानावर असताना आपल्यातील झुंज आणि मैदानाबाहेरची आपली मैत्रिपूर्ण भांडण कायम लक्षात राहतील. भारतीयांच्या मनात तुझं नेहमीच एक खास स्थान होतं. तू फार लवकर आमच्यातून निघून गेलास. ” अशा शब्दांमध्ये सचिन तेंडुलकरने दु:ख व्यक्त केले आहे.

आपण आतापर्यंतचा एक महान खेळाडू गमावला आहे – ब्रायन लारा

“ … या क्षणी निश्बद आहे, मला खरच समजत नाही की मी या क्षणाला मी कसं आवरू. माझा मित्र गेला. आपण आतापर्यंतचा एक महान खेळाडू गमावला आहे!! माझ्या भावना त्याच्या कुटुंबासोबत आहेत. वॉर्नी तुझी आठवण येईल. ” असं ब्रायन लाराने म्हटलं आहे.

स्पिनला कूल बनवणारा सुपरस्टार शेन वॉर्न आता राहिला नाही – सेहवाग

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही शेन वॉर्नच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आणि म्हटले की, “विश्वास बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, स्पिनला कूल बनवणारा सुपरस्टार शेन वॉर्न आता राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु ते समजून घेणे खूप कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.”

चॅम्पियन आम्हाला सोडून गेला आहे – रोहित शर्मा

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही ट्विट करून वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माझ्याकडे खरोखर शब्द नाहीत, हे अत्यंत दुःखद आहे. आमच्या खेळातील एक महान दिग्गज आणि चॅम्पियन आम्हाला सोडून गेला आहे. RIP शेन वॉर्न… अजूनही यावर विश्वास बसत नाही”.

Shane Warne Died : शेन वॉर्नचं ‘ते’ ट्वीट ठरलं शेवटचं ; ‘या’ खेळाडूबद्दल व्यक्त केल्या होत्या भावना

या शिवाय शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर विराट कोहली, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, मोहम्मद शमी, आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स आणि क्रिकेटशी संबंधित अन्य अनेकजण देखील ट्वीट करून शोक व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shane warne died cricket world mourns shane warnes death mourning from many including sachin tendulkar brian lara sehwag msr

ताज्या बातम्या