scorecardresearch

कुटुंबीय, मित्रपरिवाराचा वॉर्नला अलविदा ; मेलबर्न येथे खासगीत अंत्यसंस्कार

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर रविवारी मेलबर्न येथे खासगीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर रविवारी मेलबर्न येथे खासगीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील माजी सहकाऱ्यांनी वॉर्नला आदरांजली वाहिली.वॉर्नचे ४ मार्च रोजी थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या पार्थिवावर ३० मार्चला मेलबर्न क्रिकेट मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्याआधी रविवारी वॉर्नच्या पार्थिवावर खासगीत अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी त्याची तिन्ही मुले, पालक आणि मित्र, तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर, मार्क टेलर, मायकल क्लार्क, माजी यष्टीरक्षक इयान हिली यांसह एकूण ८० मान्यवरांनी वॉर्नला आदरांजली वाहिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shane warne s family and friends say goodbye at private funeral zws

ताज्या बातम्या