Shaqkere Parris Hits 124 meter monster six in CPL 2024 : क्रिकेटच्या इतिहासात एकामागून एक लांबलचक षटकार मारताना तुम्ही पाहिले असेलच. अनेक वेळा असे देखील घडते जेव्हा फलंदाज आपली सर्व शक्ती वापरतो आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवतो. आता सीपीएल २०२४ मधील एका षटकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्रिनबागो नाइट रायडर्सचा सलामीचा फलंदाज शक्केरे पॅरिसने हा १२४ मीटर लांब षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणाऱ्या ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची बरोबरी केली

डावाच्या तिसऱ्या षटकात गुडाकेश मोतीच्या चेंडूवर शक्केरे पॅरिसने हा षटकार ठोकला. मोतीने पॅरिसच्या स्लॉटमध्ये चेंडू दिला आणि या कॅरेबियन फलंदाजाने आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर करून चेंडू मिड-विकेट आणि लाँग-ऑनमध्ये सीमारेषेबाहेर पाठवला. मात्र, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला नाही. शक्केरे पॅरिसने आपल्या षटकाराने सर्वांना चकित केले. या षटकाराच्या जोरावर त्याने मॉर्ने मॉर्केलच्या षटकाराच्या विक्रमाची बरोबरी केली.

ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची केली बरोबरी –

उल्लेखनीय आहे की इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात लांब षटकारांचा विक्रमही १२४ मीटरचा आहे. आयपीएल २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना प्रग्यान ओझा विरुद्ध ॲल्बी मॉर्केलने हा गगनचुंबी षटकार मारला होता. पण या सामन्यात तो आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने २९ चेंडूंत २ चौकार आणि तब्बल २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test : बांगलादेशचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

त्रिनबागो नाइट रायडर्स विजयी –

या सामन्याबद्दल बोलायचे तर सीपीएल २०२४ चा १९ वा सामना त्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गयाना संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १४८ धावा केल्या. त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने हे लक्ष्य १९.२ षटकात ५ विकेट्स शिल्लक असताना गाठले. आंद्रे रसेलने २४० च्या स्ट्राईक रेटने १५ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या, तर टीम डेव्हिडने ३१ धावांची खेळी केली.