Sharjah Cricket Stadium New Record: अफगाणिस्तान वि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज ६ नोव्हेंबरला खेळवला जात आहे. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा पहिला सामना शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना सुरू होताच या स्टेडियमने एक नवा विक्रम रचला आहे.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहे. यासह, शारजाह क्रिकेट स्टेडियम हे ३०० पुरुषांचे सामने आयोजित करणारे जगातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बनले आहे. बुधवारच्या सामन्यापूर्वी यूएईच्या या ऐतिहासिक स्टेडियमवर २५२ वनडे, ३८ टी-२० आणि १० कसोटी सामने खेळले गेले होते. श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा पहिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर १९८४ मध्ये आशिया चषकातील वनडे म्हणून खेळला गेला.

Rishabh Pant Take Blessings of Mother and Departs for Austrlia Video Goes Viral Border Gavaskar Trophy IND vs AUS Series
Rishabh Pant Video: याला म्हणतात संस्कार! ऋषभ पंतचा आईबरोबरचा एअरपोर्टवरील व्हीडिओ होतोय व्हायरल, ऑस्ट्रेलियाला झाला रवाना
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Jalaj Saxena Becomes 1st Player With 6000 Runs and 400 Wickets in History of Ranji Trophy
Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

१९९० च्या दशकात अनेक संस्मरणीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या या स्टेडियममध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रसिद्ध ‘डेझर्ट स्टॉर्म’ हल्ल्यासह सात एकदिवसीय शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकरच्या सात शतकांची बरोबरी फक्त पाकिस्तानचा सईद अन्वर करू शकला आहे.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन

सचिन तेंडुलकरच्या या मैदानावरील अविस्मरणीय कामगिरींसाठी शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे २०२३ साली सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त ‘सचिन तेंडुलकर स्टँड’ असे नामकरण करण्यात आले. या मैदानावर आयोजित केलेल्या जवळपास ५० टक्के सामन्यांमध्ये पाकिस्तानने भाग घेतला आहे. या मैदानावर पाकिस्तानने १४४ पैकी ९३ सामने जिंकले आहेत. या मैदानावर श्रीलंकेने ८७ पैकी ३२ सामने जिंकले आहेत. या मैदानावर सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत ७२ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३५ जिंकले आहेत. या मैदानावर भारताने २००० मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. बांगलादेश, हाँगकाँग, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड यांना या मैदानावर आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट

२०० हून अधिक सामन्यांचे आयोजन करणारे स्टेडियम

शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह – १९८४ ते २०२४ – ३०० सामने
सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी – १८८२ – २०२४ – २९१ सामने
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न – १८७७-२०२४ – २८७ सामने
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे – १९९२ – २०२४ – २६७ सामने
लॉर्डस, लंडन – १८८४- २०२४ – २२७ सामने

Story img Loader