Shikhar Dhawan And Shreyas Iyer Dance: भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन मैदानाबाहेर त्याच्या मजेशीर शैलीसाठी ओळखला जातो. धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर एक ना एक मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळीही त्याने तेच केले. यावेळी धवनने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवनसोबत संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही दिसला. या व्हिडिओमध्ये दोघांनीही जबरदस्त डान्स केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Baby Calm Down गाण्यावर केला डान्स

धवनचा हा व्हिडिओ पंजाब किंग्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की श्रेयस अय्यर धवनचा मोबाईल हिसकावून पळून जातो आणि धवन त्याला पकडतो. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत बेबी कॅलम डाउन गाणे वाजत आहे. या गाण्याच्या माध्यमातून अय्यर धवनला शांत होण्यास सांगतात. यानंतर दोघेही नाचू लागतात. दोन्ही खेळाडूंच्या डान्स मूव्ह्स नजरेसमोर येत आहेत.

या डान्सचे चाहते जोरदार कौतुक करत आहेत. यामध्ये तुम्ही पहिले फक्त अय्यर नाचताना पाहू शकता. यानंतर धवनही त्यांच्यात सामील होतो. हा व्हिडिओ शेअर करत पंजाब किंग्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ज्यावेळी या जोडीने स्टेजला आग लावली तेव्हा आम्ही शांत होऊ शकत नाही!”

येत्या वर्षात २०२३ मध्ये धवनला संधी मिळाली नाही

उल्लेखनीय म्हणजे, ३७ वर्षीय शिखर धवनने १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो एकदिवसीय सामना होता. यानंतर भारतीय संघ श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध वन डे आणि टी२० सामन्यांची मायदेशात मालिका खेळला आहे. धवनला कोणत्याही मालिकेत संघाचा भाग बनवण्यात आले नाही.

हेही वाचा: Sharad Pawar on Team India: “कराचीतील एका ठिकाणी मी गेलो होतो तेव्हा…” शरद पवारांनी सांगितला पाकिस्तानात घडलेला ‘तो’ किस्सा

पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर एनसीएमध्ये उपस्थित आहे

न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता, त्यानंतर त्याचे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव सत्र सुरू होते. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, अय्यर याच्या पाठीचे दुखणे कमी झालेले नाही आणि त्याला अजून किमान दोन आठवडे लागू शकतात, असे समजले होते, पण धवनचा हा व्हिडिओ अंदाज बघताना असे दिसत आहे की श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरस्त आहे. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेला नागपूर कसोटीपासून ९ फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan and shreyas iyer dance on the song baby calm down fans are praising after watching the video avw
First published on: 05-02-2023 at 12:03 IST