घटस्फोटानंतर शिखर धवनची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणाला…

शिखर धवन आणि पत्नी आयेशाने लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे.

shikhar dhawan, shikhar dhawan divorce, shikhar dhawan and ayesha mukherjee divorced, ayesha mukherjee, ayesha mukherjee divorced,
आयेशाचे हे दुसरे लग्न होते.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने पत्नी आयेशासोबत घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. त्यामुळे लग्नाच्या जवळपास ९ वर्षांनंतर आयेशा आणि शिखर धवन यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सर्वांनाच धक्का बसला. घटस्फोटानंतर शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

शिखरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच ‘एखादे धैय्य साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि मनापासून काम करावे लागते. आपण करत असलेल्या कामावर आपले प्रेम असलायला हवे आणि आपण ते आनंदाने करायला हवे. तेव्हाच त्या कामात आपल्याला यश मिळते आणि काम करताना आनंद देखील होतो. तुमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या’ या आशयाचे कॅप्शन शिखर धवनने दिले असून त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Video: दोघांमध्ये आता तिसरा, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवी एण्ट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केले होते. आयेशाचे हे दुसरे लग्न होते. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना सात वर्षाचा एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आयेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे. घटस्फोट घेण्यापूर्वी त्या दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले होते. इतकेच नाही तर आयेशाने शिखर सोबतचे एकत्र फोटो देखील डिलीट केले होते. आता अखेर त्यांनी घटस्फोट घेतल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shikhar dhawan first instagram post after divorce avb