Shikhar Dhavan: … जेव्हा शिखर धवनने १४-१५ व्यावर्षी केली होती HIV चाचणी, टीम इंडियाच्या गब्बरने केला मोठा खुलासा

Shikhar Dhawan took HIV test: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. धवनने सांगितले की, तो १४-१५ वर्षांचा असताना त्याची एचआयव्ही चाचणी केली. धवनने असे का केले याचे कारण सांगितले आहे.

Shikhar Dhavan: When Shikhar Dhawan took an HIV test at the age of 14-15 Team India's Gabbar made a big revelation
सौजन्य- (ट्विटर)

इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या आवृत्तीत पंजाब किंग्जचा कर्णधार असणारा भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. माहितीसाठी, शिखर धवनच्या शरीरात अनेक टॅटू आहेत. शरीरावर अनेक टॅटू असलेल्या डावखुऱ्या फलंदाजाने उघड केले की त्याच्या एका टॅटूसाठी वापरल्या जाणार्‍या सुईच्या भीतीमुळे त्याची एचआयव्ही चाचणी झाली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

शिखर धवन जेव्हा मनालीला गेला तेव्हा तिथे त्याने पाठीवर टॅटू काढला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खूप ओरडले होते आणि शिखरच्या वडिलांनी तर त्याला मारहाणही केली होती. कारण त्याच्या या कृत्याबद्दल घरातील कुणालाही माहिती नव्हती. भारतीय फलंदाजाने खुलासा केला की यानंतर त्याने एचआयव्ही चाचणी केली, ज्याचा निकाल निगेटिव्ह आला होता.

हेही वाचा: Indore Stadium Pitch Rating: ‘…तेच अंतिम सत्य!’ BCCIच्या अपीलनंतर ICCने बदलला आपला निर्णय

शिखर धवनने आज तकच्या एका कार्यक्रमात सांगितले की, “मी १४-१५ वर्षांचा असताना मनालीला गेलो होतो आणि तिथे माझ्या कुटुंबीयांना न सांगता माझ्या पाठीवर टॅटू काढला. मला ते काही काळ लपवावे लागले. तीन-चार महिन्यांनी जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी मला खूप मारले. मी घाबरलो होतो कारण मला माहित नव्हते की ज्या सुईने माझा टॅटू बनवला होता ती यापूर्वी किती वेळा वापरली गेली होती. म्हणून मी एचआयव्ही चाचणीसाठी गेलो जी निगेटिव्ह आली होती. आतापर्यंत अनेकवेळा एचआयव्ही चाचणी केली असून ती निगेटिव्हच आहे.”

प्रत्येक क्रिकेटर त्याच्या भविष्याचा आणि करिअरचा खूप विचार करतो: शिखर धवन

शिखर धवन पुढे म्हणाला, “जर ही मुलाखत माझ्यासोबत ७ ते ८ वर्षांपूर्वी झाली असती तर कदाचित मी इतका (मॅच्युअर) प्रगल्भ झालो नसतो. मला ते थोडे विचित्र वाटले असते कारण प्रश्न मला खूप वेगळ्या पद्धतीने विचारले गेले असते. क्रिकेटपटू कोणीही असला तरी तो त्याच्या भविष्याचा आणि करिअरचा नक्कीच विचार करतो.

हेही वाचा: IPL 2023: CSKच्या सराव सत्रात जडेजा – स्टोक्सच्या मैत्रीचा पोस्ट व्हायरल, चाहत्यांनी केली रोनाल्डो-मेस्सीची तुलना

शिखर धवन सध्या चांगला फॉर्ममध्ये नाही आणि त्यामुळेच त्याला भारतीय संघात संधी मिळत नाहीयेत. २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी फारसे चांगले राहिले नाही. सध्या, धवन आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. ३१ मार्चपासून या महान स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज या मोसमात चांगली कामगिरी करतो का हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:04 IST
Next Story
IPL 2023: केकेआर कर्णधारपदाच्या शर्यतीत सुनील नरेनसह ‘या’ भारतीय खेळाडूचे नाव आघाडीवर, दोन दिवसात होणार घोषणा
Exit mobile version