Premium

शिखर धवनने चेतेश्वर पुजाराची घेतली मजा! इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ‘VIDEO’वर केली मजेशीर कमेंट

Shikhar Dhawan Funny Comment: इराणी ट्रॉफीपूर्वी सराव करताना पोस्ट केलेल्या चेतेश्वर पुजाराच्या व्हिडीओवर शिखर धवनने एक मजेदार कमेंटची केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शिखर धवनच्या कमेंटची चर्चा होत आहे.

Shikhar Dhawan's comment on Cheteshwar Pujara's post
चेतेश्वर पुजाराच्या सरावाचा व्हिडीओवर शिखर धवनची कमेंट (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shikhar Dhawan’s comment on Cheteshwar Pujara’s post: बुधवारी पुजाराने फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यावर भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने चेतेश्वर पुजाराच्या इन्स्टाग्राम पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या टीम इंडियाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत नाहीत. मात्र, त्यांची लोकप्रियता चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेतेश्वर पुजारा सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच तो इंग्लंडमधील ससेक्स काउंटीमध्ये खेळून भारतीय संघात परतला होता. ३५ वर्षीय चेतेश्वर पुजारा आता आगामी इराणी ट्रॉफीसाठी स्वत:ला तयार करत आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या सरावाची झलक चाहत्यांना दाखवली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पुजाराने यासोबत कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, ‘पुन्हा मेहनत करायला तयार. इराणी ट्रॉफीची तयारी.’

यावर शिखर धवनने मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला आता तरुणांना खेळण्याची संधी द्यावी, असे त्याने पुजाराला सांगितले. त्याने लिहले, ‘भाऊ, बस कर आता आणि तरुणांना खेळू दे. इराणी आता तुझ्यासाठी नानी ट्रॉफी बनली आहे.’

शिखर धवनची कमेंट

शिखर धवनने नुकतेच त्याच्या भविष्याबद्दल सांगितले होते. तो म्हणाला की, आपल्या भविष्याबाबत त्याने निवडकर्त्यांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या ५० षटकांच्या मालिकेनंतर धवन भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. शुबमन गिल आणि इशान किशन यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली. त्यामुळे धवनच्या अडचणी वाढल्या आहेत.

२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी धवनची भारतीय संघात निवड झाली नव्हती. यानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत माझे नाव नसल्याने मला धक्का बसला होता. पण नंतर मला वाटले की त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ऋतुराज गायकवाडसाठी मी आनंदी आहे. तिथे सगळी तरुण मुलं आहेत. मला आशा आहे की ते चांगली कामगिरी करतील. मी नक्कीच तयार असेल, म्हणूनच मी स्वतःला फिट ठेवतो.’

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shikhar dhawan said on cheteshwar pujaras post bro stop now and let the youngsters play vbm

First published on: 28-09-2023 at 13:26 IST
Next Story
IND vs AUS ODI Series: रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी के एल राहुलकडे देत जिंकली चाहत्यांची मनं, पाहा VIDEO