Shikhar Dhawan say on social media Pakistan & fielding never ending love story: आपल्या प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त योगदानामुळे, ऑस्ट्रेलियाने मंगळवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट सराव सामन्यात पाकिस्तानचा १४ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने आपल्या तयारीचा भक्कम पुरावा सादर केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात ३५१ धावा होत्या. प्रत्युतरात पाकिस्तानचा संघ ३५७ धावांवर आटोपला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे.

खराब क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानचा संघ होतोय ट्रोल –

पाकिस्तान संघ हा सामना हरला. पण सामन्यादरम्यान त्याची क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेष्टेचे ठरले. विश्वचषकापूर्वी त्यांचे क्षेत्ररक्षण पाहून चाहते संघाची खिल्ली उडवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डावातील २३व्या षटकातील हारिस रौफच्या पहिल्याच चेंडूवर मार्नस लाबुशेनने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळला. दुसरीकडे, थर्ड मॅनच्या बाजूने मोहम्मद वसीम ज्युनियर आणि डीप स्क्वेअर लेगमधून मोहम्मद नवाज चेंडू रोखण्यासाठी धावले, पण समोरून येणारा वसीमची धडक टाळण्याच्या प्रयत्नात नवाज चेंडू रोखण्यासाठी वाकला नाही. त्यामुळे चेंडू रेषेच्या बाहेर गेला.

Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Gautam Gambhir Picks All Time World XI He Has Played Against and Includes 3 Pakistan Players
Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान
Yashasvi Jaiswal Will be Massive Challenge for All of Us Bowlers Said Australia Nathon Layon
IND vs AUS: रोहित, विराट नाही तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला भारताच्या ‘या’ तरूण खेळाडूचं टेन्शन, इंग्लंडच्या खेळाडूकडून घेतल्या टिप्स

यानंतर टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवनने पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची चांगलीच खिल्ली उडवली. त्याने पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाचा हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) अॅपवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “पाकिस्तान आणि क्षेत्ररक्षणाची कधीही न संपणारी प्रेम कहाणी.” ज्यामुळे आता पाकिस्तानचा संघ सोशल माडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेला फक्त एक दिवस बाकी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग?

या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल (७७) आणि कॅमेरॉन ग्रीन (नाबाद ५०) यांनी अर्धशतके झळकावली. त्यांच्याशिवाय डेव्हिड वॉर्नरने ४८, मार्नस लाबुशेनने ४० आणि जोश इंग्लिसने ४८ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझम (९०) आणि इफ्तिखार अहमद (८३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४७.४ षटकांत ३३७ धावांत गारद झाला. या दोघांशिवाय मोहम्मद नवाजने ४२ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली.