Shikhar Dhawan with Mystery Girl Video Viral: सोशल मीडियावर विविध व्हीडिओच्या माध्यमातून कायमचं चर्चेत असलेला क्रिकेटपटू म्हणजे शिखर धवन. शिखर धवनने २०२४ मध्ये व्हीडिओ शेअर करत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आता शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका नवीन मुलीबरोबर दिसत आहे. शिखर धवन नवीन मिस्ट्री गर्लबरोबर मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता आणि तेथील त्याचा हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

धवनबरोबर दिसणारी ही नवी मिस्ट्री गर्ल कोण आहे? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण धवन आता घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि तो या मुलीशी लग्न करणार का असे बरेच प्रश्न चाहत्यांमध्ये सुरू आहेत, त्यामुळे या व्हीडिओमध्ये ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. शिखर धवनबरोबरच ती मिस्ट्री गर्लसुद्धा कारमधून उतरली. यानंतर ती कॅमेराकडे पाठमोरी उभी होती. इतकंच नव्हे तर ही कोणी भारतीय नसून विदेशी आहे. एअरपोर्टमध्ये आत जाईपर्यंत ती धवनपासून खूप लांब आणि मागे उभी होती, जेणेकरून त्या दोघांचा कोणी एकत्र फोटो क्लिक करू नये.

Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट,…
Mohammed Shami Can Join Team India in Australia After NCA Fitness Report IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमीबाबत दुसऱ्या कसोटीदरम्यान मोठी अपडेट, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
England reach 500000 Test runs first team to achieve landmark
England World Record: ५ लाख धावा! इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
Mohammed Siraj Bowled World Fastest Ball Highest Speed of 181 6 kmph Know The Truth IND vs AUS
Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

हेही वाचा – IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?हेही वाचा –

शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. धवन आणि आयेशा यांना झोरावर नावाचा एक मुलगाही आहे. मात्र, आता धवन नव्या मिस्ट्री गर्लबरोबर दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पण धवनने मात्र अद्याप याबाबत अधिकृत काहीही जाहीर केलेले नाही.हा व्हीडिओ विरल भय्यानी या पापराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

धवनने याच वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएलसह देशांतर्गत स्पर्धांपासूनही त्याने स्वतःला दूर ठेवले आहे. धवन भारतीय संघातून गेल्या अनेक काळापासून बाहेर आहे. संघात युवा खेळाडूंना दिलेल्या संधीमुळे धवनला टीम इंडियात संधी मिळत नव्हती, त्यामुळे त्याला निवृत्तीची घोषणा करावी लागली.

हेही वाचा – टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्तीची केली घोषणा, ‘या’ टूर्नामेंटनंतर क्रिकेटला करणार अलविदा

शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द

शिखर धवन भारताचा एक यशस्वी आणि उत्कृष्ट सलामीवीर होता. धवनने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ३५ कसोटी सामन्यांमध्ये ४०.६१ च्या उत्कृष्ट सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत आणि ७ शतके आहेत. त्याने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत. ६८ टी-२० सामन्यांमध्ये या खेळाडूने २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत.

Story img Loader