IND vs PAK Shivam Dube Shouts at Rinku Singh: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत कोलंबोमध्ये सुरू आहे. यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताने कडवी लढत देता येईल अशी १७५ धावांची धावसंख्या उभारली आहे. पण भारताच्या डावातील अखेरच्या षटकात शिवम दुबे अचानक रिंकू सिंहवर संतापला, पण नेमकं काय घडलं?
टी-२० विश्वचषकातील सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध २० षटकांत १७५ धावा केल्या. इशान किशनने शानदार ७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि शिवम दुबेनेही २७ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं, पण शिवम दुबेला पाकिस्तानविरूद्ध सामन्यात रनआऊट होत मैदानाबाहेर जावं लागलं आहे. यादरम्यान नेहमी शांत दिसणारा शिवम दुबे संतापलेला दिसला.
शिवम दुबे रिंकू सिंहवर अचानक का संतापला?
शिवम दुबे धावबाद झाल्यामुळे रिंकूवर संतापला. शिवमने शाहीन आफ्रिदीच्या २० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगच्या चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या कॉलमुळे धावबाद आला. शाहीनच्या पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट खेळला. त्याने शिवम दुबेला दुसऱ्या धावेसाठी बोलावलं, पण तो अचानक थांबला. शिवमने रिंकूला दोन वेळा कॉल दिला, तेव्हा रिंकूने पुढे येण्याची अॅक्शन केल्यामुळे शिवम त्याच्या क्रीजवरून पुढे गेला आणि तितक्यात रिंकू थांबला आणि शिवम मात्र त्याच्या क्रीजवर परतू शकला नाही आणि धावबाद झाला.
शिवम दुबे यानंतर रिंकू सिंहवर संतापलेला दिसला आणि तो निघून जाताना त्याच्यावर ओरडत होता. धावबाद झाल्यामुळे तो नाराज झाला होता. महत्त्वाचं म्हणजे शिवम दुबे नामिबियाविरुद्ध सामन्यात धावबाद झाला होता आणि त्यावेळीही रिंकू सिंग नॉन-स्ट्राइक एन्डवर होता.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात महत्त्वाच्या क्षणी शिवम दुबेने शानदार खेळी केली. हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर येऊन त्याने सूर्याच्या मदतीने टीम इंडियाचा डाव सावरला. शिवमने १७ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह २७ धावा केल्या. कोलंबोच्या खेळपट्टीवर झटपट धावा काढणं सोपं नव्हतं, परंतु दुबेने हुशारीने फलंदाजी करत या धावा केल्या. ज्यामुळे संघ १६०चा आकडा पार करू शकला. रिंकू सिंगनेही ४ चेंडूत ११ धावा केल्या. त्याने अखेरच्या षटकात १ चौकार षटकार लगावला आणि टीम इंडियाला १७५ धावांवर नेलं.
