पाकिस्तानी मंत्र्याने मध्यस्ती केल्यानंतर ‘त्या’ प्रकरणावर शोएब अख्तर म्हणाला, “माझ्या भावना…”

टी -२० वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि पीटीव्ही अँकरमध्ये वाद झाला होता.

टी -२० वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि पीटीव्ही अँकरमध्ये वाद झाला होता. त्यानंतर शोएबने लाइव्ह शोमध्ये राजीनामा दिला होता. चॅनलचे अँकर डॉ.नौमान नियाज यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप शोएबने केला होता. आता पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने दोघांमध्ये समेट घडवून आणला आहे. लाईव्ह शोमध्ये अपमान करणाऱ्या टीव्ही अँकरची माफी शोएब अख्तरने स्वीकारली आहे.

पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी हा समेट घडवून आणला आहे. पाकिस्तानी सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तिघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की,  “All is well that ends well.”

 टीव्ही अँकर नौमान नियाज यांनी थेट टीव्ही कार्यक्रमात शोएब अख्तरसोबत केलेल्या वागणुकीबद्दल “बिनशर्त” माफी मागितली होती. अँकरने म्हटले होती की “मला अधिकार नव्हता. चूक करणे हे मानवीय आहे आणि त्यासाठी मी माफी मागतो. फक्त एदा नाही तर लाखो वेळा. शोएब हा रॉकस्टार राहिला आहे. कॅमेऱ्यात जे काही घडले ते अशोभनीय होते.”

स्वत: शोएब अख्तरनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे की, “नॅशनल टेलिव्हिजनवर ही एक अप्रिय घटना होती आणि त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या होत्या. दरम्यान, उच्च नैतिक आधार घेऊन, मी अँकर नौमान नियाज  यांची माफी स्वीकारत आहे. यातून पुढे जाऊ या.”

नक्की काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पीटीव्हीचा राजीनामा दिला होता. २७ ऑक्टोबर रोजी पीटीव्ही स्पोर्ट्स कार्यक्रम “गेम ऑन है” च्या पॅनेलमध्ये दोघे सहभागी झाले होते. अख्तर आणि नौमान व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स, इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गॉवर, पाकिस्तानची माजी महिला कर्णधार सना मीर आणि माजी वेगवान गोलंदाज उमर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे सर्वजण पाकिस्तान-न्यूझीलंड टी-२० विश्वचषक सामन्याची चर्चा करत होते. पाकिस्तानने हा सामना पाच विकेटने जिंकला.

पाकिस्तानी संघावरील चर्चेदरम्यान, अख्तरने शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांच्या शोधाचे श्रेय पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर कलंदर फ्रँचायझीला दिले. त्यानंतर नियाजने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो थांबला नाही तेव्हा त्याने शोएब अख्तरला सांगितले की, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ते सहन करणार नाही. तो म्हणाला- “तुम्ही जाऊ शकता. मी हे ऑन एअर सांगत आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shoaib akhtar accepts ptv anchor apology imran minister reconciles srk

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या