“याचा बदला घेऊ…”; न्यूझीलंडनंतर, इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केल्याने शोएब अख्तरला राग अनावर

न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shoaib akhtar issues warning new Zealand t 20 world cup
ईसीबीच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर चांगलाच भडकला आहे. (फोटो PTI)

न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते. ईसीबीने लवकरच पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात आपला निर्णय देईल असे म्हटले होते मात्र सोमवारी त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने मागील शुक्रवारी पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला.

ईसीबीच्या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर चांगलाच भडकला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे समजून घेतले पाहिजे की कोणीही त्यांच्याबाजूने भूमिका घेणार नाही आणि त्यांना स्वतःची भूमिका घ्यावी लागेल. जर मी पीसीबी प्रमुख असतो तर आगामी काळात इंग्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसता असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप भडकलेला दिसत आहे. “तुम्ही आमच्या संपूर्ण देशाची प्रतिमा खराब करत आहात. तुम्हाला हे दाखवायचे आहे की आमचे सैन्य आणि बुद्धिमत्ता तुमचे संरक्षण करू शकत नाही. जर मी पीसीबी प्रमुख असतो, तर मी येत्या काळात इंग्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसतो आणि केवळ सुरक्षा धोक्यांचा हवाला दिला असता,” असे अख्तरने म्हटले आहे.

“टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध आहे, पण २६ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध मोठा सामना होईल. न्यूझीलंडला हरवण्यासाठी संपूर्ण संघाने एकत्र काम केले पाहिजे. पहिल्यांदा पीसीबीने आपली निवड निश्चित करावी आणि संघातील त्या तीन-चार मुलांना स्थान द्यावे जे बाहेर आहेत. राग व्यक्त करण्याची ही योग्य वेळ असेल, पाकिस्तान संघाला आता हेच करावे लागेल. पाकिस्तानने यापेक्षा वाईट काळ पाहिला आहे, आम्ही पुन्हा परत येऊ. विश्वचषक जिंकून आम्ही याचा बदला घेऊ,” असे अख्तरने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shoaib akhtar issues warning new zealand t 20 world cup abn

ताज्या बातम्या