Shoaib Akhtar On India vs Pakistan Match: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. एजबॅस्टनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. १७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या १०६ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ६४ धावांनी आपल्या नावावर केला. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय गोलंदाजांवर जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “क्रिकेटमध्ये आमची स्थिती अत्यंत दयनीय आहे. पुरुष क्रिकेट संघापासून ते महिला संघापर्यंत आणि अंडर-१९ पातळीवरही आम्ही भारतीय संघाला कुठल्याही फॉरमॅटमध्ये पराभूत करु शकलेलो नाही. ही आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आता मला लाज वाटू लागली आहे. समालोचन करतानाही भीती वाटू लागली आहे. आम्ही भारतापेक्षा हजार पटीने मागे आहोत.”

भारतीय संघाची दमदार कामगिरी

या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेली शफाली वर्मा स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने मिळून भारताचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९१ धावा जोडल्या.यादरम्यान स्मृतीने ६८ धावांची खेळी केली. त्यानंतर ऋचा घोषने ३४ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या १७० धावांवर पोहोचवली.

पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १७१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली होती. पण ३८ धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. पाकिस्तानकडून मुनीबाने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर गुलने १२, आयशा जफरने १२ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारताने हा सामना ६४ धावांनी आपल्या नावावर केला. दीप्तीने ४ षटकात अवघ्या धावा करुन या ५ विकेट्स मिळवल्या. यासह ती प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.