Shoaib Akhtar: “तीनपैकी ‘हा’ फॉरमॅट सोडून दे!” विराट कोहलीला शोएब अख्तरचा अजब सल्ला

Virat Kohli vs Shoaib Akhtar: विराट कोहलीने आता केवळ दोन फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने व्यक्त केले आहे.

Shoaib Akhtar's bold statement about Virat Kohli advised him to leave this format said If he plays 30 more Test matches
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Virat Kohli vs Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीबाबत मोठे विधान केले आहे. शोएब अख्तरचा असे मत आहे की कोहलीने टी२० सोडून एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडू शकेल. विराट कोहलीने गेल्या विश्वचषकानंतर एकही टी२० सामना खेळलेला नाही.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ पासून विराट कोहलीने एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत खेळत आहे, परंतु सध्या त्याची टी२० आंतरराष्ट्रीय संघात निवड झालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १८६ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. यावरच रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असणाऱ्या शोएब अख्तरने वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: IPL 2023 Schedule: १० संघ, १८ डबल हेडर, २ ग्रुप, नवीन वेन्यू; इंडियन प्रीमियर लीग २०२३चे वेळापत्रक जाहीर, ३१ मार्चपासून वाजणार बिगुल

टी२० मध्ये खूप ऊर्जा खर्च होते

स्पोर्ट्स तकवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, “एक क्रिकेटपटू म्हणून माझा विश्वास आहे की विराट कोहलीने फक्त एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटच खेळले पाहिजे. टी२० मुळे त्याची बरीच ऊर्जा वाया जाते. तो एक अतिशय उत्साही पात्र आहे. तो पुढे म्हणाला की कोहली टी२० मध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते. त्यालाही ते आवडतंय. पण त्याला त्याचे शरीर तंदुरस्त ठेवायला हवे.”

अख्तर पुढे म्हणाला, “त्याला टी२० क्रिकेट आवडते, पण असे काही प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराचा विचार करावा लागतो. आता त्याचे वय किती आहे? ३४व्या वर्षी तो आणखी किमान सहा ते आठ वर्षे खेळू शकतो. जर त्याने आणखी ३०-५० कसोटी खेळल्या तर तो या फॉरमॅटमध्ये आणखी २५ शतके करू शकतो.” अख्तर म्हणाला, “तो त्याच्या मानसिक आरोग्याकडे कसा पाहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुदैवाने तो एक मजबूत खेळाडू आहे, तो पंजाबी आहे, त्याच्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. नेहमी तो त्याच्या फिटनेसवर काम करत असतो.”

हेही वाचा: IPL vs PSL: ‘केवढा तो कॉन्फिडन्स!’ पीसीबी प्रमुख नजम सेठींच्या मते पीएसएल आयपीएलपेक्षा डिजिटल रेटिंगच्या तुलनेत अव्वल, जाणून घ्या

किंग कोहलीने ७५ शतके झळकावली आहेत

२००८ मध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हा विक्रम पूर्ण झाला. या सामन्यात कोहलीने १८६ धावांची शानदार खेळी करत संघाला पराभवापासून वाचवले. कोहलीने १०८ कसोटीत २८ शतके, २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६ आणि ११५ टी२० सामन्यांमध्ये एक शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय आणि टी२० मध्ये ४-४ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:07 IST
Next Story
IPL vs PSL: ‘केवढा तो कॉन्फिडन्स!’ पीसीबी प्रमुख नजम सेठींच्या मते पीएसएल आयपीएलपेक्षा डिजिटल रेटिंगच्या तुलनेत अव्वल, जाणून घ्या
Exit mobile version