scorecardresearch

Premium

IND vs PAK: ‘…म्हणून २०२१ मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला’; शोएब अख्तरने केला खुलासा

Shoaib Akhtar on Indian Media: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शोएब अख्तरच्या मते टीम इंडियावर प्रचंड दबाव असतो. शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार, भारतीय मीडिया आपल्या क्रिकेटर्सवर खूप दबाव टाकते, ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.

Indian Media Pressures Team India
टीम इंडिया आणि शोएब अख्तर (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Team India is under pressure from the Indian media: एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, भारताच्या कामगिरीचे प्रमुख कारण देशातील मीडिया आहे, जे संघावर दबाव आणते. याच दबावामुळे २०२१ साली भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.

शोएब अख्तरने भारतीय मीडियावर उपस्थित केले प्रश्न –

शोएब अख्तरने रेज स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय मीडिया आपल्या खेळाडूंची काळजी करत नाही. ते त्यांच्यावर खूप दबाव टाकतात जे चुकीचे आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणाला, ‘मी मीडियाच्या लोकांना सांगू इच्छितो की, थोडा विचार करा. इतका दबाव कोण निर्माण करतो? हा दबाव कसा निर्माण होतो हे मला माहीत आहे पण ते अत्यंत चुकीचे आहे.’

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
india vs england ks bharat believes indian team will make strong comeback in second test
इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास
Loksatta explained Pakistan disqualified for third consecutive Olympics
तीन वेळा ऑलिम्पिक विजेते, तरी सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी अपात्र… पाकिस्तान हॉकीचे मातेरे का झाले?

पाकिस्तानला होतो फायदा –

यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकाची आठवण करून देताना शोएब अख्तर म्हणाला, ‘मी दुबईत पाहिले. मी तिथे भारताच्या स्थानिक वाहिनीशी बोलत होतो. त्यांनी टीम इंडियाच्या रंगात सर्व काही रंगवले. टीम इंडिया पाकिस्तानला हरवेल एवढेच ते सांगत होते. जेव्हा तुम्ही आम्हाला अंडरडॉग बनवता, तेव्हा आमच्यावरील दबाव संपतो. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते म्हणून आम्ही गेलो आणि सामना जिंकला. हे नेहमीच असेच राहिले आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्याने पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू संतापला, बंदी घालण्याची केली मागणी

विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली झाली नाही –

२०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभव झाला होता. गतवर्षी त्यांनी पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला असला. तरी भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. २०१९ मध्येही भारताचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला होता. उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shoaib akhtar says defeats against pakistan as indian media puts pressure on team india vbm

First published on: 18-08-2023 at 14:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×