scorecardresearch

PAK vs AFG: ‘अगर हमारे पठान भाई और हम लोग…’ रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवावर चोळले मीठ

Shoaib Akhtar: अफगाणिस्तानने टी२० मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचवेळी आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अफगाणिस्तानला मालिका जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

PAK vs AFG: Shoaib Akhtar's statement on Afghanistan's victory said If our Pathan brothers and we are great
सौजन्य- (ट्विटर)

Shoaib Akhtar On Afghanistan Cricket Team: अफगाणिस्तानने ३ टी२० मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २७ मार्च रोजी शारजाह येथे खेळला जाणार असला तरी अफगाणिस्तान संघाने २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अफगाणिस्तानने मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पठाण आणि बंगाली आक्रमक आहेत, दोघांनी एकत्र खेळले तर ते जगातील अव्वल संघ बनू शकतात, असे ते म्हणाले. वास्तविक रावळपिंडी एक्सप्रेसने अफगाण आणि पाकिस्तानी खेळाडूंची तुलना केली.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शारजाहमध्ये ३ टी२० मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने युवा खेळाडूंनी सजलेल्या पाकिस्तान संघाचा पराभव केला. टी२० मध्ये अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पहिला विजय ठरला. अफगाणिस्तानच्या या विजयाने केवळ संघाचे चाहतेच नाही तर पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरही खूश आहे. संघाच्या पराभवाचे त्याला दु:ख वाटत नाही. ते म्हणाले की, आमचे पठाण बांधव विजयी झाले आहेत. अख्तर म्हणाला की, “अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला व्यवस्थित प्लॅन करून हरवले आहे.”

‘अगर हमारे पठान भाई और बंगाली लोग…’- शोएब अख्तर

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला व्यवस्थित हरवले आहे.” त्याच्या भाषेत तो म्हणाला “अफगानिस्तान संघाने पाकिस्तानला चांगलीच फैंटी लगावली आहे.”   अफगाणिस्तान संघ खरोखर मोठा होत असून त्यांना अंडर डॉग म्हणणे चुकीचे आहे. त्यांचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोन्ही उत्कृष्ट दर्जाचे आहेत. मोहम्मद नबीने चांगली गोलंदाजी केली, मला खात्री आहे की, यंदा भारतात जेव्हा विश्वचषक होईल, तेव्हा अफगाणिस्तानही एक मजबूत संघ म्हणून आपली दावेदारी तिथे नोंदवणार. आमचे पठाण बांधव विजयी झाले याचा मला खूप आनंद आहे. शादाब खानने हिंमत गमावू नये, तो चांगला कर्णधार असून पुढच्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी आशा आहे.”

हेही वाचा: Kohli vs Babar: “तुलना तर सोडाच तो…”, माजी पाकिस्तानी खेळाडूने बाबर-विराटच्या फिटनेसवर स्वतःच्याच संघाला दिला घरचा आहेर

इथे आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर जिथे पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत आहे, तर दुसरीकडे शोएब अख्तर वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. तो आपल्या संघाच्या पराभवाची तक्रार करतानाही दिसला. कोणताही खेळाडू आपल्या संघाच्या पराभवाचा अभिमान कसा बाळगू शकतो याचे लोकांना आश्चर्य वाटते. माहितीसाठी, अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी२० सामना ६ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ९ गडी गमावून ९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने १७.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा करून सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:58 IST

संबंधित बातम्या