न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याची सळ अजून पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात कायम आहे. यामुळे पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू न्यूझीलंडला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधील सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने पाकिस्तानी चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. त्याचं ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

“मी सर्व पाकिस्तानी चाहत्यांना विनंती करतो की शांत राहा, मैदानात जल्लोष करू नका. नाही तर न्यूझीलंडचा संघ सुरक्षेच्या कारणास्तव मैदानातील आवाज ऐकून सामना स्थगित करेल.”, असं ट्वीट शोएब अख्तरने केलं आहे.

मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतले होते.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टील, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी.