आगामी टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने अजून एक बदल केला आहे. पाकिस्तानने अनुभवी क्रिकेटपटू आणि भारताचा जावई शोएब मलिकचा संघात समावेश करण्याची घोषणा केली. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरलेल्या सोहेब मकसूदच्या जागी शोएब मलिकचा समावेश करण्यात आला आहे. एमआरआय स्कॅननंतर असे आढळून आले की या दुखापतीतून बरे होण्यासाठी मकसूदला अधिक वेळ लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकसूदचा यापूर्वी १५ सदस्यीय मुख्य संघात समावेश होता. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर राष्ट्रीय टी-२० चषकाच्या सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. “सोहेबचे विश्वचषकातून बाहेर पडणे निराशाजनक आहे, कारण त्याने त्यासाठी कठोर परिश्रम केले होते आणि तो उत्तम फॉर्मात होता”, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले.

मंडळाने म्हटले, ”संघ व्यवस्थापनाशी बोलल्यानंतर आम्ही शोएब मलिकला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला खात्री आहे की शोएबचा अनुभव संपूर्ण संघाला उपयोगी पडेल. शोएब मलिक २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या हंगामात संघाचा कर्णधार होता आणि २००९ मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघाचा सदस्य होता. तो २०१२, २०१४ आणि २०१६ हंगामातही खेळला आहे.

हेही वाचा – IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरबाबत ‘मोठा’ खुलासा! मेगा ऑक्शनपूर्वी महत्त्वाची माहिती आली समोर

पाकिस्तान संघात समाविष्ट खेळाडू

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी आणि शोएब मलिक

राखीव खेळाडू – खुशदील शहा, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib malik has been included in pakistans twenty20 world cup squad adn
First published on: 10-10-2021 at 17:36 IST