Shoaib Malik says I’m more fit than 25-year-old player and challenging to the team return is much possible no one can ignore me | Loksatta

Shoaib Malik: ‘अभी तो मे जवान हू!’ शोएब मलिकने पुनरागमनाबद्दल केले मोठे विधान म्हणाला, “२५ वर्षीय खेळाडूशी …”

Shoaib Malik on Retirement Plan T20 Cricket: पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक दोन दिवसात ४१ वर्षांचा होईल पण ४० ओलांडूनही, तो पाकिस्तानच्या टी२० संघात पुनरागमन करण्याच्या आशा बाळगत आहे.

Shoaib Malik says I’m more fit than 25-year-old player and challenging to the team return is much possible no one can ignore me
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Shoaib Malik on Retirement Plan T20 Cricket: शोएब मलिक २ दिवसांनी ४१ वर्षे पूर्ण करेल आणि त्याचे ४२वे वर्ष सुरू होईल. ४० ओलांडली असली तरी सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. याउलट तो पाकिस्तानच्या टी२० संघात पुनरागमन करेल अशी आशा आहे. त्याला अजूनही वाटते की तो पाकिस्तान संघासाठी अनेक वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मलिकने पाकिस्तानकडून शेवटचा सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो टी२० सामन्यात उतरला.

शोएब मलिक सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्स संघाकडून खेळत आहे. एक दिवस अगोदर सिलहट स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात तो उतरला होता. मात्र खाते न उघडताच पॅव्हेलियन परतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, मी क्रिकेट खेळतच राहणार आहे. त्यामुळेच मी निवृत्तीचा विचार करत नाही. पाकिस्तानी अष्टपैलू शोएब मलिक खेळाडू पुढे म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवा, मी जगातील कोणत्याही संघाचा सर्वात वयस्कर सदस्य होऊ शकतो. पण तरीही मी फिटनेसच्या बाबतीत तरुणांपेक्षा कमी नाही. फिटनेस चाचणीत मी कोणत्याही युवा खेळाडूला माझ्याशी लढण्याचे आव्हान देऊ शकतो.”

हेही वाचा: IND vs NZ: पिच क्युरेटर बनला हार्दिकच्या रागाचा शिकार, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर झाला गोंधळ, नोकरी गेली, करिअर संपले!

फिटनेसमध्ये २५ वर्षीय खेळाडूशी स्पर्धा करू शकतो: शोएब

तो पुढे म्हणाला, “मी संघातील वरिष्ठ किंवा सर्वात जुना खेळाडू असलो तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पण तुम्ही माझ्या फिटनेसची तुलना २५ वर्षीय खेळाडूशी करू शकता. त्यामुळे मला असे वाटते की मला मैदानात उतरताना अजूनही आनंद मिळतो आणि मला अजूनही वाटते की मला क्रिकेट खेळण्याची भूक आहे आणि जोपर्यंत या दोन गोष्टी आहेत तोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहीन. आणि म्हणूनच मी आहे. निवृत्तीचा अजिबात विचार करत नाही.”

‘मी एकाच वेळी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार’

या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, मी आंतरराष्ट्रीय किंवा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून एकत्र निवृत्ती घेईन. पण सध्या मी याचा अजिबात विचार करत नाहीये. कारण मी माझ्या क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेत आहे. मला जिथे संधी मिळेल तिथे मी खेळेन आणि माझे सर्वोत्तम देईन. टी२० फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने शोएबने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. २०२१ मध्ये युएई मध्ये झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये नेण्यात शोएब मलिकची महत्त्वाची भूमिका होती.

हेही वाचा: ILT20: एकाने चेंडू घेऊन पळ काढला, तर एकाने परत केला… रोहितच्या जिगरी दोस्ताने केली गोलंदाजांची धुलाई, Video व्हायरल

शोएब मलिकच्या नावावर १० हजारांहून अधिक धावा

शोएब मलिकने ऑक्टोबर १९९९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे पाकिस्तान संघासाठी पदार्पण केले होते. शोएब मलिकने १२४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १२५.६४ च्या स्ट्राइक रेटने २४३५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, शोएब मलिकने २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४.५५ च्या सरासरीने आणि ९ शतकांच्या मदतीने ७५३४ धावा केल्या आहेत. शोएबने ३५ कसोटी सामनेही खेळले, ज्यात त्याने ३५.१४ च्या सरासरीने १८९८ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 13:46 IST
Next Story
IND vs NZ: पिच क्युरेटर बनला हार्दिकच्या रागाचा शिकार, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर झाला गोंधळ, नोकरी गेली, करिअर संपले!