भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सद्या खराब फॉर्मचा सामना करतो आहे. त्यामुळे विराटवर चौफेर टीका होत असताना त्याच्या समर्थनात पाकिस्तानी खेळाडू येत आहेत. आधी बाबर आझम आणि आता पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेदेखील कोहलीचे समर्थन केल आहे. तसेच कोहलीवर टीका करणाऱ्यांचा देखील त्याने समाचार घेतला.

शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीवर सातत्याने टीका होत आहे. त्याला संघातून वगळावे, असेही अनेकांनी सुचवले आहे. तर त्याचे करिअर आता संपले असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, विराट हा महान खेळाडू आहे. गेल्या दशकातला तो सर्वोत्तम फलंदाज आहे. तो सध्या फॉर्ममध्ये नाही. गेल्या काही दिवसांत त्याने धावा केल्या आहेत. फक्त त्याने शतक ठोकलेले नाही, अशी प्रतिक्रिया अख्तरने दिली आहे.

हेही वाचा – कोहलीला आश्वासनांची गरज नाही! ; भारतीय संघातील स्थानाबाबत कर्णधार रोहितचे स्पष्टीकरण

“कपिल देव यांच्या मताचा आदरच”

काही दिवसांपूर्वीच कपिल देव यांनी कोलहीच्या फॉर्मबाबत बोलताना ”जर रविचंद्रन अश्विनसारख्या खेळाडूला कसोटीतून वगळले जाऊ शकते, तर कोहलीला टी-२० मधून वगळले जाऊ शकते”, असे वक्तव्य केले होते. यावर अख्तरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”देव यांचे स्वतःचे मत असू शकते. मी त्यांच्या मताचा आदर करतो.

हेही वाचा – बुमराह सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच्या दाव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, “शाहीन आफ्रिदी त्याच्यापेक्षा…”

विराटवर टीका करणाऱ्यांचा घेतला समाचार

खराब फॉर्मवरून सद्या जे कोहलीवर टीका करत आहेत. त्याचा शोएबने चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला, ”मीडियामध्ये फक्त कोहलीच अपमान केला जातो आहे. त्याला बदनाम करणं योग्य नाही, त्याला वगळण्याबद्दल कोणी कसं बोलू शकतो, हे मला कळत नाही? विराट कोहलीची 70 शतके आहेत आणि फक्त एक महान खेळाडू तेवढ्या धावा करू शकतो”

बाबर आझमकडून कोहलीचे समर्थन

यापूर्वी पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमने विराटसोबतचा फोटो ट्वीट करून विराटला पाठिंबा दिला होता. “हा वेळही निघून जाईल. खंबीर राहा,” असा संदेशही त्यांने विराटला दिला होता.