Shreyas Iyer Sister On Her Breakup: भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तो पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना पंजाब किंग्जने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्यावेळी पंजाबचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, तिने १ पॉईंट दिला, असा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवरून तिला जोरदार ट्रोल केलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे, तिने एका शो मध्ये आपल्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला आहे.
श्रेष्ठा अय्यरने मुंबईतील प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान तिने, मध्यपान करून आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्याचा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
तर झाले असे, श्रेष्ठा अय्यरने आपल्या मैत्रिणीसोबत कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी प्रणित मोरेने तिला आपल्या वैद्यकीय आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्याने विचारलं, तू मद्यपान करतेस? त्यावर उत्तर देत ती म्हणाली, “मी नुकतंच सोडलं आहे, पण हो आधी मी मद्यपान करायचे.” हे सांगत असताना तिने ब्रेकअपचा किस्सा सांगितला.
श्रेष्ठाने सांगितलं, मध्यपान केल्यानंतर तिने आणि तिच्या मैत्रिणीने आपल्या पार्टनरसोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिने हे देखील सांगितलं की, दोघांचे पार्टनर टॉक्सिक किंवा त्रास देणारे नव्हते, पण मनात आलं म्हणून ब्रेकअप केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
कोण आहे श्रेष्ठा अय्यर?
श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर ही एक अभिनेत्री आहे. यासह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डांसर आणि कोरिओग्राफर देखील आहे. याआधी २०२६ मध्ये ती सरकारी बच्चा या चित्रपटात ॲग्रीमेंट करले.. या आयटम साँगमध्ये डान्स करताना दिसून आली होती. ती पंजाब किंग्जला समर्थन करताना दिसून येत आहे.
