Shreyas Iyer Statement: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रांचीत पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्माने यांच्या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४९ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे भारतीय संघ हा सामना एकतर्फी जिंकणार असं वाटत होतं. पण धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून शे होप आणि रुदरफोर्डने वादळी फटकेबाजी केली. शे होपच्या शतकी खेळीचा बळावर वेस्ट इंडिजने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “दव पडल्यावर परिस्थिती खूप कठीण होते. अशावेळी कितीही धावा करा, त्यांचा बचाव करणं कठीण असतं. २४९ धावांचं आव्हान त्यांनी २ षटकं राखून पूर्ण केलं. या खेळपट्टीवर गोलंदाज चूक करूच शकत नव्हते. कारण जराही इकडे तिकडे चेंडू पडला की, तो स्टँड्समध्येच जात होता.”

यासह श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचं कौतुक केलं. शे होप आणि रुदरफोर्डच्या फलंदाजीबद्दल बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अविश्वसनीय फलंदाजांनी केली. त्यांना श्रेय द्यावेच लागेल. रुदरफोर्ड आणि होप या दोघांनी आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली. दोघांनी शतकी भागीदारी केली आणि सामना आमच्याकडून हिसकावून घेतला.”

यासह भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “आम्हाला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माकडून अशाच वेगवान सुरुवातीची अपेक्षा आहे. मयंक यादवने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. पण शेवटी होप आणि रुदरफोर्डच्या भागीदारीमुळे सामना फिरला.” यासह वेस्ट इंडिजने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत.