IND vs AUS Test Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अय्यरने हातात रेडबुल घेतल्याचे दिसत असून त्यासोबत तो डान्स करतोय. याआधीही अय्यर अनेकदा डान्स करताना दिसला आहे. तो बऱ्याचदा सोशल मीडियावर असे मजेदार व्हिडिओ शेअर करत असते.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटीपूर्वी भारतीय संघाचे खेळाडू सहा दिवसांच्या विश्रांतीवर आहेत. दुसरीकडे, श्रेयस अय्यर विश्रांती घेत नसून तो त्याच्या केकेआर सहकाऱ्यांसोबत वेळ घालवत आहे. अय्यरने आयपीएल २०२३ साठी सहा दिवसांच्या विश्रांतीचा उपयोग केला. ज्यामध्ये त्याने सहकाऱ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी केला आहे. केकेआर १६ व्या मोसमातील पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध मोहाली येथे खेळणार आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ मधील स्थिती –

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळला गेला. या सामन्यात देखील भारताने ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्सने विजय मिळावला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदूर आणि चौथा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

हेही वाचा – ENG vs NZ 2nd Test: जेम्स अँडरसनने रचला मोठा विक्रम; मुथय्या मुरलीधरनला मागे टाकत केला ‘हा’ कारनामा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

हेही वाचा – IND vs AUS: ‘हरताना पाहणे वाईट होते पण…’, Harmanpreet Kaur ने पराभवानंतर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिले ‘हे’ वचन

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ –

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर