Asia Cup 2022 : आशिया चषकात काल झालेला श्रीलंका आणि बांगलादेश सामना रोमहर्षक ठरला. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ च्या स्थितीत होता. अखेर श्रीलंकेने बाजी मारत सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, या सामन्यादरम्यान, श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी कर्णधार दुशान शनाकाला पाठवलेले काही संदेश चांगलेच चर्चेचा विषय ठरले. सामना संपल्यानंतर त्यांनी याबाबत खुलासाही केला.

हेही वाचा – SL vs BAN सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेकडून रडीचा डाव? ड्रेसिंग रुममधून कोड्स वापरुन दिली माहिती; चाहते संतापून म्हणाले, “मग मैदानात…”

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड हे कर्णधार दुशान शनाकाला कोड भाषेत काही संदेश देताना दिसले. या संदेशांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी ड्रेसिंग रूममधून श्रीलंकेचा कर्णधार दुशान शनाकाला सामन्यात अनेक वेळा हे संदेश पाठवले.

हेही वाचा – विश्लेषण: नागीण डान्सचे मूळ काय? बांगलादेश-श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये या डान्सच्या प्रसिद्धीचे कारण काय?

सामना संपल्यानंतर ख्रिस सिल्व्हरवूड यांनी यासंदर्भात खुलासा केला. ते म्हणाले, “हे रॉकेट सायन्स नाही. या संदेशाद्वारे कर्णधाराला त्यावेळी मैदावर असलेल्या फलंदाजाविरुद्ध कोणाला गोलंदाजी द्यायची याबाबत सुचना करण्यात येत होत्या. इतर अनेक संघही ही पद्धत वापरतात.” तसेच ”प्रशिक्षकांनी पाठवलेला संदेश अंमलात आणायचा की नाही, हे सर्वस्वी कर्णधारावर अवलंबून आहे. कर्णधाराला संदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक नाही.”, असेही ते म्हणाले.