Shubham Pundir Century: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना जम्मू- काश्मीर आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. जम्मू- काश्मीर संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या संघाकडे जेतेपदाची ट्रॉफी उंचावून इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना जम्मू-काश्मीरकडून शुभम पुंडीरने दमदार शतकी खेळी केली आहे. शुभमने १८६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.
या सामन्यात जम्मू-काश्मीरचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या १८ असताना जम्मू-काश्मीर संघाला पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर शुभमने मिळून जम्मू-काश्मीर संघाचा डाव सांभाळला. तो दमदार फलंदाजी करून ९४ धावांवर पोहोचला. शतक पूर्ण करण्यासाठी ६ धावांची गरज असताना त्याने पुढे येऊन मिड विकेटच्या वरून खणखणीत षटकार मारला. या षटकारासह त्याने आपलं शतक पूर्ण केलं. शुभमने वीरेंद्र सेहवाग स्टाईल षटकार मारून आपलं शतक पूर्ण केलं.
या सामन्यात जम्मू-काश्मीरचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे.या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर जम्मू-काश्मीर संघाने २ गडी बाद २८४ धावा केल्या आहेत. या संघाकडून शुभम पुंडीरने २२१ चेंडूत ११७ धावांची खेळी केली आहे. तो पहिल्या दिवशी नाबाद परतला आहे. तर त्याला साथ देचत अब्दुल समदने देखील महत्वपूर्ण खेळी केली आहे. अब्दुल समदने ६७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली आहे या दोघांनी मिळून १०५ धावांची खेळी केली आहे.
या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाकडून सलामीला आलेल्या यावेर हसनने ८८ धावांची खेळी केली. तर संघाची धावसंख्या १६ असताना जम्मू-काश्मीर संघाला पहिला मोठा धक्का बसला. कमरान इकबाल अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शुभम पुंडीर आणि हसनने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या.
या सामन्यात गोलंदाजी करताना प्रसिध कृष्णाने वेगवान बाऊन्सर चेंडू टाकला. या चेंडूवर कर्णधार पारस डोंगरा दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला. त्यामुळे ९ धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं.
