कर्णधार शुबमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं कसोटी द्विशतक झळकावलं आहे. कर्णधार शुबमन गिलने ३११ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह हे द्विशतक पूर्ण केलं. पहिल्या दिवशी फलंदाजीला आलेला भारताचा कर्णधार दुसऱ्या दिवशीही एक टोक धरून ठेवत टीम इंडियाचा डाव उचलून धरला आहे. कर्णधार शुबमन गिलने स्वत: संघाच्या मोठ्या धावसंख्येची जबाबदारी घेत धावा केल्या आहेत. गिलने या द्विशतकासह एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुबमन गिल ११४ धावा करून नाबाद परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याने आपली चांगली फलंदाजी सुरूच ठेवली. गिलने संयमही दाखवला अन् चांगले आक्रमक फटकेही खेळले. आता त्याने द्विशतक झळकावलं आहे. याशिवाय त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत.

शुबमन गिलने मोडला विराट कोहलीचा विक्रम

शुबमन गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विदेशी संघांच्या धर्तीवर सर्वात मोठी कसोटी खेळी खेळणारा गिल हा पहिला भारतीय कर्णधार आहे. गिलच्या आधी विदेशात सर्वात मोठी कसोटी खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर २०० धावांची खेळी केली होती. आता गिलने किंग कोहलीचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल हा इंग्लंडच्या धर्तीवर द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहली, एम एस धोनी यांनाही हा कारनामा करता आलेला नाही. याशिवाय इंग्लंडमध्ये सर्वात मोठी कसोटी खेळी खेळण्याचा विक्रमही गिलच्या नावावर आहे.