IND vs AUS 4thTest Updates: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुबमन गिल शानदार फलंदाजी करत आहे. पाहुण्या संघाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. यादरम्यान गिलने कसोटी क्रिकेटमधील दुसरे शतकही पूर्ण केले. या खेळीदरम्यान गिलने मिचेल स्टार्कची जोरदार धुलाई करताना विश्वविक्रम केला.

शुबमन गिल आता एकदाही बाद न होता, कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानच्या नावावर होता. युनूस खानने पहिल्यांदा आऊट होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाजाविरुद्ध ११२ धावा केल्या होत्या, मात्र अहमदाबाद कसोटीत गिलने त्याचा विक्रम मोडला आहे. वृत्त लिहिपर्यंत शुबमन गिलने वैयक्तिक धावसंख्या १०३ पर्यंत पोहोचवली असून या डावात त्याने आतापर्यंत १० चौकार आणि १ आकाशी षटकार लगावला आहे.

Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर –

टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात ३६ धावांपासून केली. भारताने पहिल्या सत्रात एकूण ९३ धावा जोडल्या. त्याचबरोबर लंच ब्रेकपर्यंत धावफलकावर १ गडी गमावून १२९ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने आतापर्यंत कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने एकमेव विकेट गमावली आहे, ज्याला ३५ च्या वैयक्तिक स्कोअरवर कुहनेमनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. ख्वाजाने ४२२ चेंडूंचा सामना करत २१ चौकारांच्या मदतीने १८० धावा केल्या, तर कॅमेरून ग्रीनने ११४ धावा करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले. ख्वाजाने खेळलेले हे चेंडू भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही फलंदाजाने खेळलेले सर्वाधिक चेंडू आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 4thTest: रोहित शर्माने मायदेशात रचला मोठा विक्रम; पुजाराची बरोबरी करत ठरला दुसरा भारतीय

या कालावधीत रविचंद्रन अश्विनने भारतासाठी सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. अश्विनने या काळात माजी दिग्गज भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे तीन विक्रम मोडले. अश्विन आता कोणत्याही देशाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यासोबतच मायदेशात सर्वाधिक ५ विकेट घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याचबरोबर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.