Shubman Gill Record In T20 Cricket: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६६ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरातच्या सलामी जोडीने हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून १२५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान शुबमन गिलने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल या हंगामात दमदार फॉर्ममध्ये आहे. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे गुजरातचा संघ आता टॉप २ मध्ये प्रवेश करण्यासाठी मैदानात उतरला आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात गुजरातला जशी सुरुवात हवी होती, ती सुरुवात शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीने करुन दिली. यादरम्यान गिलने ३७ चेंडूंचा सामना करुन ७ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करण्याचा पल्ला गाठला आहे.
शुबमन गिलने टी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो सर्वात वेगवान ६००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. गिलने १८५ सामन्यांमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने १६२ सामन्यांमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर बाबर आझमने १६५ सामन्यांमध्ये ६००० धावांचा पल्ला गाठला होता. यासह त्याच्या नावे आणखी मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. शुबमन गिल हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारताकडून सर्वात जलद ६००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल अव्वल स्थानी आहे. केएल राहुलने हा कारनामा १६६ व्या डावात केला होता. तर दुसऱ्या स्थानी असेलल्या विराट कोहलीच्या नावे १८४ डावात ६००० धावा पूर्ण करण्याची नोंद आहे. आता गिल या यादीत तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलने १८५ व्या डावात हा पल्ला गाठला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करणारे फलंदाज
१६२ – ख्रिस गेल
१६५ – बाबर आझम</p>
१६६ – के. एल. राहुल
१८० – शॉन मार्श
१८० – डेव्हन कॉनवे
१८४ – विराट कोहली</p>
१८५ – शुभमन गिल
