Premium

“शुबमन गिलचा ऍटिटयूड जरा…” WTC आधी ऑस्ट्रेलियन स्टार रिकी पॉंटिंगचे मोठे विधान; म्हणाला, “त्याचा क्लास..”

Ricky Ponting on Shubman Gill In WTC: जून २०२१ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतासाठी सलामी देताना शुबमन गिल २२ वर्षांचाही नव्हता आणि आता…

Shubman Gill Has Attitude Since IPL 2023 Says Ricky Ponting Before WTC Championship Australian Ex Captain Big Statement
"शुबमन गिलचा ऍटिटयूड जरा…" WTC आधी ऑस्ट्रेलियन स्टार रिकी पॉंटिंगचे मोठे विधान (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ricky Ponting on Shubman Gill In WTC: जून २०२१ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतासाठी सलामी देताना शुबमन गिल २२ वर्षांचाही नव्हता आणि आता आयपीएल २०२३ नंतर शुबमन गिलचे नाव जगभरात गाजले आहे. वनडेमध्ये विश्वविक्रमी द्विशतक, आयपीएल २०२३ मधील तीन शतके या आकडेवारीच्या बळावर गिल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारताची बाजू उचलून धरेल अशा सर्वांनाच अपेक्षा आहेत. ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे होणार्‍या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया व भारत आमनेसामने येणार आहे. यावेळी गिलचा फॉर्म उत्तम असल्याने भारताला विजयी होण्यासाठी मोठा बूस्ट मिळू शकतो. या सगळ्यात आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याने शुबमन गिलवर केलेली कमेंट क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये गिल कर्णधार रोहित शर्मासह फलंदाजीची सलामी देईल हे निश्चित आहे. भारताची फलंदाजीची फळी मजबूत असली तरी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या मातब्बरांना सामोरे जाण्याची जबाबदारी गिलच्या खांद्यावर असेल. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने आयपीएलच्या गेल्या काही हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणून गिलला जवळून पाहिले आहे, म्हणूनच WTC साठी गिलविषयी रिकी पॉंटिंगने मांडलेले मत खास ठरत आहे.

“गिलचा क्लासच…” रिकी पॉंटिंगचे मोठे विधान

पॉन्टिंगने आयसीसीला सांगितले की, “तो तरुण आहे व जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्यात एक प्रकारचा ऍटिट्यूड आहे आणि त्याचा क्लासही जरा सिरीयस आहे. गिलची खासियत ठरलेला फ्रंट फूट शॉर्ट हा आर्म पुल ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विचार करायला लावू शकतो. वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना हाच शॉर्ट गिलसाठी आवश्यक ठरू शकतो.”

दरम्यान, शुबमन गिल भारतीय क्रिकेटपटूंसह गुरुवारी पहिल्या प्रशिक्षण सत्रात सहभागी झाला होता. गिल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा आयपीएल २०२३ फायनलचा भाग असल्याने उशीरा संघात सामील झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shubman gill has attitude since ipl 2023 says ricky ponting before wtc championship final australian ex captain big statement svs

Next Story
Pro League Hockey प्रो लीग हॉकी: भारताचा ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला धक्का