Shubman Gill made a statement, after which he is being trolled a lot | Loksatta

Video:’४००-४५० धावा वर्षात फक्त १-२ सामन्यात होतात’: शुबमन गिलच्या वक्तव्यावर भडकले चाहते; म्हणाले, ‘तुझ्यासारखे..’

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पावसाने रद्द झाल्यानंतर शुबमन गिलने एक विधान केले, ज्यानंतर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

Video:’४००-४५० धावा वर्षात फक्त १-२ सामन्यात होतात’: शुबमन गिलच्या वक्तव्यावर भडकले चाहते; म्हणाले, ‘तुझ्यासारखे..’
शुबमन गिलच्या चारशे साडेचारशे धावांच्या वक्तव्यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहेत. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पावसामुळे रद्द केला गेला. सामन्यानंतर भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरे गेला. ज्यामध्ये त्याने वनडे क्रिकेटमधील ४०० धावसंख्येबाबत एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन चाहते आता त्याला ट्रोल करत आहेत.

गेल्या काही वर्षांत टी-२० क्रिकेटच्या परिचयाने ५० षटकांचे क्रिकेट पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी संघ ३०० धावा करून हमखास जिंकायचे, पण आता ३००-३५० धावांचा यशस्वी पाठलाग केला जातो. एखाद्या संघाने ४०० धावा केल्या तरी त्याही सुरक्षित नाहीत. इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा अनेक वेळा ओलांडला आहे. आता इंग्लंड ज्या प्रकारे खेळत आहे, ते एकदिवसीय क्रिकेटमध्येही ५०० धावा करेल.

त्याचबरोबर टीम इंडिया अजूनही ४०० धावांचा टप्पा पार करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. दरम्यान, अशाच एका प्रश्नावर शुबमन गिलने असे उत्तर दिले असून त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना रद्द झाल्यानंतर जेव्हा शुबमनला एका पत्रकाराने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४००-४५० धावा करण्याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला की, हे वर्षभरात फक्त १-२ सामन्यांमध्येच घडते.

सामन्यानंतर शुबमन म्हणाला, “४०० ते ४५० सारखे स्कोअर एका वर्षात फक्त एक किंवा दोन गेममध्ये केले जातात. जर तुम्ही ३०० धावा केल्या तर तो चांगला सामना होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही प्रथम फलंदाजी करत आहात की पाठलाग करत आहात यावरही हे अवलंबून असते. पण प्रत्येक सामन्यात ४०० धावा करणे इतके सोपे नसते. आणि मला वाटत नाही की कोणताही संघ ४००-४५० धावा करू पाहत असेल तर ते शक्य आहे.

गिलचे हे वक्तव्य ऐकून काही चाहत्यांना सोशल मीडियावर चांगलाच राग आला आहे. त्याचबरोबर त्यांनी गिलला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने तर गिलने केएल राहुलचा मार्ग अवलंबल्याचेही सांगितले.

हेही वाचा – ‘माही भाईने मला शिकवले, जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा …’: ऋतुराजचे धोनीबद्दल मन जिंकणारे वक्तव्य

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 14:47 IST
Next Story
ज्याला संघात स्थान मिळत नाही त्याला गौतम गंभीर म्हणाला, टीम इंडियाचा भावी कर्णधार