Shubman Gill is rumored to be dating Avneet Kaur : भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आतापर्यंत त्याचे नाव अनेक बॉलीवूड सुंदरींसोबत जोडले गेले आहे, तर सारा तेंडुलकरसोबतही त्याच्या डेटिंगच्या बातम्या येत आहेत. पण, आता या क्रिकेटरने २५ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर तो २२ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून याआधीही ते अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊया.

खरंतर, ८ सप्टेंबरला शुबमनच्या वाढदिवसाला अवनीत कौरने त्याच्यासोबतचा फोटो शेअर करून एक स्टोरी पोस्ट केली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अवनीत दररोज इन्स्टाग्रामवर तिचे किलर फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या सर्वात जास्त तिचा शुबमन गिलबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत अवनीतच्या त्या लूकवर एक नजर टाकूया, ज्यांच्या तुलनेत बॉलिवूडच्या सौंदर्यवतीही फिक्या पडतात.

अभिनेत्री अवनीत कौरची व्हायरल इन्स्टा स्टोरी

अवनीत कौरने शुबमन गिलच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्टोरी –

शुबमन गिलने ८ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी अवनीत कौरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शुबमनसोबतचा एक फोटो शेअर केला होताा. अवनीतने या फोटोसोबत लिहिले होते की, “शुबमन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू लोकांना अशीच प्रेरणा देत राहा. मला तुझा खूप अभिमान आहे.” या पोस्टने सोशल मीडियावर पटकन लोकप्रियता मिळवली आणि फोटो व्हायरल झाला.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने वर्कआउट करत असतानाचा शेअर केला ‘फनी’ VIDEO, चाहते म्हणाले…

विशेष म्हणजे याआधी अवनीत आणि शुबमन लंडनमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या रिलेशनबाबत बातम्या सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी या बातम्यांना फारसे महत्त्व मिळाले नाही. आता, शुबमनच्या वाढदिवसानिमित्त अवनीतच्या पोस्टने या अफवांना पुन्हा एकदा खतपाणी घातले आहे. शुबमन गिल आणि अवनीत कौर याआधीही अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात दोघेही ऑस्ट्रेलियात एकत्र दिसले होते.

हेही वाचा –Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

कोण आहे अवनीत कौर?

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शोध सुरू केला की अवनीत कौर कोण आहे? अवनीत कौर ही एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात डान्स इंडिया डान्स लिटलमास्टर्समधून स्पर्धक म्हणून केली होती. डान्स के सुपरस्टार या आणखी एका डान्स शोमध्येही ती सहभागी झाली होती. तिचे इन्स्टाग्रामवर ३२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि ती तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने लाखो हृदयांवर राज्य करते. शुबमन गिल आणि अवनीत कौर याआधीही अनेकदा एकमेकांसोबत दिसले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात दोघेही ऑस्ट्रेलियात एकत्र दिसले होते.