भारतीय क्रिकेटरसिकांना २०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय संघ सध्या या स्पर्धेची तयारी करत आहे. सध्या खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकांमधील खेळाडूंच्या कामगिरीवरून विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ तयार होणार आहे. त्यामुळे खेळाडू मिळत असलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच संधी युवा फलंदाज शुभमन गिलला मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं आहे.

शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा जमवतोय. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने द्विशतक झळकावून त्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे शुभमनची विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात जागा पक्की मानली जात आहे. परंतु यामुळे अनेक स्टार खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद होणार आहेत. ३७ वर्षीय अनुभवी फलंदाज शिखर धवनचं नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

मुंबईचा पृथ्वी शॉ आणि पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची प्रतीक्षा वाढली

शिखर धवन सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशातच शुभमनने आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करून इतर खेळाडूंच्या चिंता वाढवल्या आहेत. यासह मुंबईचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याला देखील आता लवकर टीम इंडियात जागा मिळेल असं दिसत नाही. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडच्या चिंता देखील वाढल्या आहेत. त्याला भारतीय संघात अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही. परंतु ज्या संधी त्याला मिळाल्या, त्यात त्याला लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धवन, शॉ आणि गायकवाडसाठी टीम इंडियाची दारं सध्या तरी बंदच राहतील. पृथ्वी शॉला भारताच्या टी-२० संघात संधी मिळाली असली तरी एकदिवसीय संघात संधीसाठी त्याला प्रतीक्षा करावी लागेल.

पृथ्वी शॉच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा

पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. अलिकडेच त्याने आसामविरुद्ध खेळवण्यात आलेल्या रणजी सामन्यामध्ये ३७९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे पृथ्वी शॉला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सलामीवीर म्हणून भारतीय संघात स्थान मिळालं आहे. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन हे देखील टी-२० संघात असल्याने पृथ्वी शॉला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत थोडी शंका व्यक्त केली जात आहे.

ऋतुराज गायकवाड संधीच्या प्रतीक्षेत

ऋतुराज गायकवाडची देखील न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. परंतु संघात शुभमन, पृथ्वी, ईशान किशन असताना ऋतुराजला संधी मिळते का याकडे ऋतुराजच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

राहुलचं स्थान धोक्यात

शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण खेळामुळे सलामीवीर आणि यष्टीरक्षक लोकेश राहुलच्या देखील चिंता वाढल्या आहेत. सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे के. एल. राहुलवर टीका सुरू आहे. त्यामुळे राहुलला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करावी लागील. शुभमन आणि इशान किशनने द्विशतकं झळकावल्यामुळे राहुलला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळणं मुश्किल आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्यामुळे राहुलचं मधल्या फळीतलं स्थान देखील धोक्यात आहे. मधल्या फळीत राहुलच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. तसेच यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनदेखील संधीच्या प्रतीक्षेत आहे.

किशनला सलामीला संधी मिळणं अवघड

इशान किशनने देखील अलिकडेच द्विशतक झळकावून आपली ताकद सिद्ध केली आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातामुळे १२ ते १८ महिने क्रिकेटपासून लांब असेल त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनला संघात संधी मिळू शकते. परंतु सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलला पसंती मिळेल. त्यामुळे किशनला सलामीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.