scorecardresearch

Rankings Announced: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल; सिराज आणि शुबमनचे नुकसान, तर बाबर आझमला झाला फायदा

ICC ODI Rankings Announced: एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवस आधी नवीनतम आयसीसी क्रमवारी जाहीर झाली आहे. भारताच्या स्टार खेळाडूंना याचा मोठा फटका बसला आहे.

Latest ICC ODI Rankings Announced
आयसीसी क्रमवारीत सिराज आणि शुबमनचे नुकसान (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Latest ICC ODI Rankings Announced: ५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे, त्याच्या एक दिवस आधी आयसीसीने बुधवारी, ४ ऑक्टोबर रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. क्रिकेटचा महाकुंभ सुरू होण्याच्या एक दिवस आधी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. भारताचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल आणि आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धुमाकूळ घालणाऱ्या मोहम्मद सिराजला यात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची चमक पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव टॉप १० मधून बाहेर पडला आहे.

सिराज आणि कुलदीपचे झाले नुकसान –

गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर मोहम्मद सिराज अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे पण आता त्याच्या स्थानावरील धोका वाढला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ६८ धावा देणार्या सिराजला ११ रेटिंग गुणांचे नुकसान झाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड त्याच्या बरोबरीला आला आहे. म्हणजेच सिराज आणि हेजलवूड हे दोघेही ६६९ गुणांसह आयसीसी क्रमवारीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय कुलदीप यादवने आपले १० वे स्थान गमावले असून तो टॉप १० मधून बाहेर पडला आहे. कुलदीप ६१६ गुणांसह ११व्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आता १०व्या स्थानावर आहे.

ICC ODI Ranking: Shubman Gill Threatens Babar Azam's ICC Ranking Know Who Is Where
ICC ODI Ranking: बाबर आझमच्या आयसीसी रॅकिंगला शुबमन गिल ठरला धोका, जाणून घ्या कोण आहे कुठे?
Asia Cup Final 2023 IND vs SL
Asia Cup Final 2023 IND vs SL: मोहम्मद सिराजचा मोठा धमाका! एकाच षटकांत ४ विकेट्स घेत केला ‘हा’ खास पराक्रम
Asia Cup Final, India vs Sri Lanka Updates
Asia Cup Final 2023: पावसामुळे ‘IND vs SL’ फायनल रद्द झाली तर कसा ठरणार विजेता? जाणून घ्या काय असेल संपूर्ण समीकरण
Asia Cup 2023 in IND vs BAN Match Updates
IND vs BAN: टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना किंग कोहलीने अस काही केलं की… विराटचा हा VIDEO पाहून तुम्हाला ही येईल हसू

शुबमन गिलचेही झाले नुकसान –

भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल जरी त्याच्या आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असला, तरी त्याचे गुण कमी झाले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८५७ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. गिलला आता ताज्या क्रमवारीत ९ गुणांचे नुकसान झाले आहे. आता त्याच्या आणि बाबरमधील अंतर वाढले आहे. गिलचे मागील क्रमवारीत ८४८ गुण होते पण आता तो ८३९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – PAK vs AUS: हैदराबादी बिर्याणीमुळे बिघडली पाकिस्तानची फिल्डिंग! पराभवानंतर शादाब खानने केला खुलासा, पाहा VIDEO

टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर कायम –

सांघिक क्रमवारीबद्दल बोलायचे, तर भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया ११६ रेटिंग गुणांसह अव्वल तर पाकिस्तान ११५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया (११२) तिसऱ्या स्थानावर, दक्षिण आफ्रिका (१०६) चौथ्या स्थानावर आणि इंग्लंड (१०५) पाचव्या स्थानावर आहे. गुरुवारपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. ही विश्वचषकापूर्वीची क्रमवारी असून आता आगामी क्रिकेट महाकुंभात या क्रमवारीत किती बदल होतात हे पाहायचे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shubman gill mohammad siraj and kuldeep yadav lose while babar azam gains in latest icc odi rankings vbm

First published on: 04-10-2023 at 18:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×