Shubman Gill Is the Leading Run Scorer 2023: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमनने यावर्षी भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. त्याचवेळी त्याचा हाच शानदार फॉर्म आयपीएलच्या १६व्या हंगामातही पाहायला मिळाला. जिथे गिलने ऑरेंज कॅप पटकावली. गिल या वर्षात टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने विराटचा विक्रम मोडला आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. शुबमन गिलने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५६.१६च्या सरासरीने १०११ धावा केल्या आहेत. वन डेमध्ये ६२४ धावा, टी२० मध्ये २०२ धावा आणि कसोटीत १८५ धावा आहेत. गिलच्या बॅटने या वर्षात आतापर्यंत ५ शतकी खेळी पाहिली आहेत. गिलने या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या होम वनडे मालिकेदरम्यान पहिल्या सामन्यात वनडे फॉरमॅटमधील पहिले द्विशतकही झळकावले. हेही वाचा: Ashes 2023: पॅट कमिन्सनं लढवला किल्ला, रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दोन विकेट्स राखून विजय या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या २ वर्षांहून अधिक काळ बॅटने झगडणाऱ्या कोहलीला कसोटी फॉरमॅटमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर शतक झळकावण्यात यश आले. कोहलीच्या बॅटने २०२३ मध्ये आतापर्यंत ४९.१८च्या सरासरीने ७८७ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत एक आणि एकदिवसीय सामन्यात दोन शतकी खेळी केल्या आहे. कोहलीने या वर्षात आतापर्यंत एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. एकदिवसीय विश्वचषकात गिल महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत शुबमन गिलचा फॉर्म भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. जिथे के. एल. राहुल ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत खेळताना दिसतो. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी गिल सांभाळू शकतो. कर्णधार रोहितने या वर्षात आतापर्यंत ४१.९३च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत. हेही वाचा: Shubaman Gill: “कर्णधारपदासाठी रोहितचा पर्याय हा शुबमन…”, BCCIचे माजी निवड समिती प्रमुखांचे मोठे विधान एकदिवसीय विश्वचषक २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. भारताने वर्ष १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली. गेल्या १० वर्षांपासून टीम इंडियाला एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण २०२३चा एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर होत आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियामध्ये असे आठ खेळाडू आहेत, ज्यांचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभाग निश्चित दिसत आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, के.एल. राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.