Shubman Gill: Ishan Kishan took the school of centurion Shubman Gill A storm raged between the two Video Viral | Loksatta

Shubman Gill: इशान किशनने शतकवीर शुबमन गिलला गमतीत मारली कानशिलात! समोर बसलेला युजवेंद्र चहल पाहत राहिला, मजेशीर Video व्हायरल

शुबमन सोशल मीडियावर सक्रिय राहतो आणि सतत पोस्ट करत असतो. गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल दिसत आहेत.

Shubman Gill: Shubman Gill recreates popular show Roadies in hotel room alongside Kishan and Chahal funny video viral
सौजन्य- (ट्विटर)

Shubman Gill And Ishan Kishan Roadies Video: तीन टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी (१ फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने १२६ धावांची नाबाद खेळी खेळली. सामन्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इशान किशन त्याला कानाखाली मारल्याचा आहे.

शुबमन सोशल मीडियावर सक्रिय राहतो आणि सतत पोस्ट करत असतो. गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल दिसत आहेत. खरंतर तिघांनीही गंमत म्हणून एक मजेदार व्हिडिओ बनवला. इशानने गिलला अनेक वेळा कानशिलात चापट मारली. गिलनेही स्वत:ला कानाखाली मारली. त्याचवेळी युजवेंद्र चहल खुर्चीवर बसून हे दृश्य एकटक पाहत राहिला.

रोडीज शोमध्ये गिल, किशन आणि चहल अभिनय करत होते. किशन इकडून तिकडे उड्या मारत होता. कधी तो गिलला कानाखाली मारत होता तर कधी शूज घालून बेडवर उड्या मारत होता. तर चहल चष्मा लावून गंभीर वागत होता. सोशल मीडियावर शतकवीर शुबमन गिलचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतो.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर शुबमनने शतक झळकावून मोठी कामगिरी केली. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली होती. गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यावरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: IND W vs SA W T20: धोक्याची घंटा, पूर्वपरीक्षेत नापास! तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय

भारतीय फलंदाज शुबमन गिल याने निर्णायक टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. गिलने टी२०तील त्याचे पहिले वैयक्तिक शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर गोलंदाजांनी किवींचा संपूर्ण संघ ६६ धावांवर माघारी पाठवला. भारताने १६८ धावांनी हा सामना जिंकून इतिहास घडविला. शुबमनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यानंतर शुबमनने गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात इशान किशन व युजवेंद्र चहल त्याच्या सोबत दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:16 IST
Next Story
BBL 2023: बिग बॅश लीगमध्ये घडली विचित्र घटना; थर्ड अंपायरच्या निर्णयाने क्रिकेटविश्वला बसला धक्का, पाहा VIDEO