scorecardresearch

Video : शुबमन गिलने टीम इंडियाला दिले ‘शुभ’संकेत! ९७ धावांवर असताना चेंडू हवेत उडाला होता, पण…

९७ धावांवर असताना शुबमनने खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू मारला. चेंडू रोखण्यासाठी कांगारूंनी खूप प्रयत्न केले, पण…

Shubhman Gill Viral Video
शुबमन गिलचा तो व्हिडीओ झाला व्हायरल. (Image-twitter)

Shubhman Gill Smashes Century : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावांचा डोंगर रचला. पण या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने कांगांरुंना जशाच तसं उत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. कारण भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि शतकी खेळी केली.

२३५ चेंडूत १२८ धावा कुटून शुबमनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण नथन लायनच्या गोलंदाजीवर शुबमन बाद झाला. पण शुबमन एक जबदरदस्त व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. ९७ धावांवर असताना शुबनमने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू मारला. चेंडू रोखण्यासाठी कांगारूंनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. हे संपूर्ण दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शुबमन गिल ९७ धावांवर खेळत असताना पॅडल स्विफ मारून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू मारल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. फाईन लेगच्या दिशेनं मारलेला चेंडू रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण चेंडू रोखण्यात मात्र त्या खेळाडूंना यथ आलं नाही आणि चेंडू सीमापार गेल्यावर शुबमन गिलच्या १०१ धावा पूर्ण होऊन शतकी खेळीचा उदय झाला. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. मैदानात ९७ धावांवर असताना चौकार मारून शुबमनने शतक ठोकलं. हे पाहून विराट कोहलीसह भारताच्या अन्य खेळाडूंचा आनंद द्विगुणीत झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Oops! शाहिद आफ्रिदीने हरभजनला मारली मिठी, पण महिला अंपायरलाही खेळाडू समजला अन् घडलं…पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होत असलेला चौथा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. त्यानंतर भारताने चांगली सुरुवात करत ३६ धावा फलकावर लावल्या. रोहित शर्माने ५८ चेंडूत ३५ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने १२१ चेंडूचा सामना करत ४२ धावांची खेळी साकारली. तर शतकवीर शुबमन गिलने १२८ धावांची मजल मारत भारताच्या पारडं भक्कम केलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 16:44 IST
ताज्या बातम्या