Shubman Gill on India Defeat as Captain IND vs ENG: शुबमन गिलच्या कसोटी कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवाने झाली. हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने भारताला ५ विकेट्सने पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षण देखील या पराभवाचे मोठे कारण ठरले. शुबमन गिलने भारताच्या या पराभवाचे कारण कोणावर फो़डलं आहे, जाणून घेऊया.

भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी दोन्ही डावात उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी या सामन्यात शतकं केली. तर ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शतक झळकावत मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. पण भारताने क्षेत्ररक्षण करताना मात्र दोन्ही डावांमध्ये मोठी चूक केली आहे.

शुभमन गिलच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवाने झाली. हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने भारताकडून विजय हिसकावून घेतला. टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षण देखील या पराभवाचे कारण ठरले.

शुबमन गिल सामन्यानंतर म्हणाला, “मला वाटतं हा एक उत्तम कसोटी सामना होता. आमच्याकडे संधी होत्या, आम्ही झेल सोडले आणि आमच्या खालच्या फळीने पुरेसे योगदान दिले नाही. पण संघाचा अभिमान आहे आणि एकंदरीत संघ म्हणून चांगला प्रयत्न केला. काल आम्ही ४३० धावांच्या आसपास धावसंख्येवर डाव घोषित करण्याचा विचार करत होतो. दुर्दैवाने आम्ही शेवटी २०-२५ धावांमध्ये ६ विकेट्स गमावले, जी खरंच चांगली गोष्ट नव्हती. आजही त्यांच्या सलामीवीरांच्या चांगल्या सुरूवातीनंतर आमच्या हातात सामना होता, पण निकाल आमच्या बाजूने लागला नाही.”

भारताची खालची फलंदाजी फळी कोसळल्याबद्दल बोलताना गिल म्हणाला, “हो आम्ही याविषयी चर्चा केली. येत्या सामन्यांमध्ये आम्हाला याबाबतीत सुधारणा करावी लागणार आहे. अर्थात, अशा खेळपट्ट्यांवर बाद करण्याच्या संधी सहज मिळत नाहीत. हा एक तरुण संघ आहे जो शिकत आहे आणि आशा आहे की आम्ही यामध्ये सुधारणा करू शकू.”

“पहिल्या सत्रात आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली, आम्ही जास्त धावा दिल्या नाहीत. चेंडू जुना झाल्यानंतर धावांवर अंकुश ठेवणं कठीण असत आणि सामन्यात टिकून राहण्यासाठी विकेट्स घेणं महत्त्वाचं होतं. दुर्दैवाने काही झेल आम्ही पकडू शकलो नाही. पण माझ्या मते त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि त्यांच्या सलामी जोडीने भागीदारीने सामना आमच्यापासून हिरावून घेतला.”, गिल पुढे म्हणाला.

जडेजाच्या गोलंदाजीबद्दल बोलताना गिल म्हणाला, “त्याने उत्तम गोलंदाजी केली. त्याने विकेटच्या काही संधी निर्माण केल्या, काही पॉप-अप झालेले झेल जे ऋषभ पकडू शकला नाही. पण क्रिकेटच्या सामन्यात असं घडत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा आता दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून सुरू होणार आह, हा सामना बर्मिंगहममध्ये खेळवला जाईल. आता या सामन्यात बुमराह खेळणार की नाही आणि संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणते बदल होणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.