Siddharth Kaul Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थने पदार्पण केलं होतं. २००८ मध्ये टीम इंडियाला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देण्यात सिद्धार्थने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिद्धार्थ कौलने २०१९ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून सिद्धार्थ भारतीय संघाबाहेर होता. आयपीएल २०२५च्या मेगा लिलावातही सिद्धार्थला संघात सामील करून घेण्यासाठी कोणत्याच संघाने बोली लावली नाही. यानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.

त्याने २०१८-१९ मध्ये तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रतिनिधित्व करणारा पंजाबचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज कौलने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – Champions Trophy: “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान…”, शाहीद आफ्रिदीने BCCI ला सुनावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य

Siddharth Kaul with Team India
सिद्धार्थ कौल भारतीय संघाबरोबर

सिद्धार्थ कौलने कौलने ‘एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘आता भारतातील माझे करिअर संपवण्याची आणि निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. देवाने माझ्यासाठी जो मार्ग निर्माण केला त्यासाठी, चाहत्यांच्या अविरत पाठिंब्याबद्दल, माझ्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांनी माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी आणि आत्मविश्वासासाठी मला आभार मानायचे आहेत. ड्रेसिंग रूममधील आठवणी आणि मैत्रीसाठी माझ्या संघसहकाऱ्यांना, भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि २००८ वर्षामधील अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचे आणि २०१८ मध्ये माझे टी-२० आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल BCCI चे आभार मानतो.

हेही वाचा – IND vs AUS: “थोडं अजून मसालेदार केलं…”, विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भन्नाट उत्तर; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सिद्धार्थने २०१८ साली टीम इंडियासाठी पदार्पण केले. या वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन सामने खेळले, परंतु यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याच वेळी, सिद्धार्थने भारतासाठी तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले, ज्यामध्ये त्याने एकूण चार विकेट घेतल्या. कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरल्यामुळे सिद्धार्थला भारतीय संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुनरागमन करता आले नाही. सिद्धार्थने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु तो जागतिक स्तरावर आपली छाप सोडू शकला नाही.

२००८ च्या चॅम्पियन संघाचा भाग

२००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. सिद्धार्थ कौल देखील या संघाचा एक भाग होता आणि त्याने चेंडूसह महत्त्वाची भूमिका बजावली. सिद्धार्थने आयपीएलमध्येही आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. या वेगवान गोलंदाजाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण ५४ सामने खेळले. या काळात त्याने ५८ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये सिद्धार्थची इकोनॉमी ८.५९ होती. तो सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायजर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता.

 Siddharth Kaul with Virat Kohli U19 2008 Team
२००८ च्या अंडर-१९ संघाचा फोटो

कौलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबसाठी ८८ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि २९७ विकेट घेतल्या. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने १११ लिस्ट ए मॅचमध्ये १९९ विकेट्स आणि १४५ टी-२० सामन्यांमध्ये १८२ विकेट घेतल्या आहेत.

Story img Loader