scorecardresearch

Video : कॉमेंट्री बॉक्समध्ये सायमन डुल यांचं वादग्रस्त वक्तव्य, हसन अली यांच्या बायकोला म्हणाले, ” तिने काही लोकांचे हृदय…”

हसन अली यांच्या भारतीय पत्नीबाबत समालोचक सायमन डुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी डुल यांना ट्रोल केलं.

simon doull commentary video viral
हसन अली यांच्या बायकोचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Pakistan Super League 2023 Viral Video : न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डुल पाकिस्तान सुपर लीगच्या समालोचनावेळी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळं चर्चेत आले आहेत. डुल यांना चुकीची टीप्पणी केल्यामुळं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. डुल यांच्यासोबत असा प्रकार एकदा नव्हे तर दोनदा घडला आहे. डुल यांच्यावर पाकिस्तानच्या चाहत्यांनीही टीका केली होती. डुल यांनी पेशावार जाल्मीचे कर्णधार बाबर आझमवर आरोप केला होता.

संघाच्या फायद्याआधी स्वत:चे विक्रम करण्याचा स्वार्थ बाबरकडे असल्याचं आरोप डुल यांनी केला होता. यावरून पाकिस्तानी चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. हे प्रकरण ताजं असतानाच डुल यांनी पीएसएल मध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि मुल्तान सुल्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान पुन्हा वादग्रस्त विधान केलं. डुल यांनी पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळं सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.

नक्की वाचा – ‘स्पायडरवुमन’ हवेत उडाली अन् फलंदाजाने नांगी टाकली, जेमिमा रॉड्रीग्जच्या अप्रतिम झेलचा Video पाहिलात का?

इथे पाहा व्हिडीओ

इस्लामाबादने मुल्तान विरोधात रोमहर्षक विजय संपादन केल्यानंतर विजेत्या संघाने जल्लोष केला. त्यावेळी डुल कॉमेंट्री करत होते. त्याचदरम्यान स्टेडियमध्ये असलेल्या हसन अली यांच्यावर कॅमेऱ्याने फोकस केलं, तेव्हा डुल म्हणाले, ” ती जिंकली आहे. मला वाटतंय तिने काही लोकांचे हृदय जिंकलं आहे. हे खूप जबरदस्त आहे. सामन्यातात मिळालेला विजयही छान आहे.”

त्यानंतर सायमन डुल यांचा कॉमेंट्रीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. याआधी डुल यांनी पेशावार जल्मीचा सामना सुरु असताना बाबर आझमच्या फलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. इनिंग सुरु असताना बाबरने ८० ते १०० धावांच्या जवळ असताना १६ चेंडू खेळले. त्याने शतक केले पण बाबरच्या फलंदाजीबाबत चाहत्यांसह डुलने प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 14:29 IST
ताज्या बातम्या