Simon Doull On Pakistan: पाकिस्तान सुपर लीग (PSL)च्या ८व्या मोसमात बाबर आझमवर केलेल्या कॉमेंट्रीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिग्गज समालोचक सायमन डूल यांनी पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवावर मोठा खुलासा केला आहे. सायमनने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, “पाकिस्तानमध्ये राहणे तुरुंगात राहण्यासारखे होते.” ५३ वर्षीय सायमन डूल सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामात कॉमेंट्री करत आहे. पीएसएलच्या मोसमात पेशावर झाल्मी संघाचे कर्णधार असलेल्या बाबर आझमने एका सामन्यात शतक झळकावले होते, मात्र यादरम्यान त्याने आपले शतक पूर्ण करताना अतिशय संथ फलंदाजी केली आणि सायमन डूलने त्याच्यावर टीका केली. यानंतर पाकिस्तानात राहणे त्याच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी ठरले नाही.

न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू सायमन डूल आता केवळ समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच त्याने लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या स्ट्राईक रेटवर टीका केली होती. यानंतर त्याचा माजी पाकिस्तानी क्रिकेटर आमिर सोहेलसोबत वाद झाला. पुन्हा एकदा सायमन डूली चर्चेत आहे. यावेळी पुन्हा त्यांनी पाकिस्तानवरच मोठी टीका केली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे. एकदा तो पाकिस्तानात अडकल्यावर त्याला अनेक दिवस उपाशी राहावे लागले.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

हेही वाचा: Ashwin on online Game: “बॅन असेल तर खेळू नका…”, ऑनलाइन rummy गेम्सवरून मिस्ट्री स्पिनर अश्विन भडकला

‘सुदैवाने कसा तरी पाकिस्तानातून बाहेर पडू शकलो’- सायमन

सायमन डूलने सांगितले की बाबर आझमचे चाहते त्याची वाट पाहत होते, त्यामुळे तो मैदानाबाहेर जाऊ शकला नाही. मग त्याने देवाचे आभार मानले आणि सांगितले की कसे तरी त्याने पाकिस्तान सोडले. किवी दिग्गजाने सांगितले की, “त्याला पाकिस्तानमध्ये खूप मानसिक छळ सहन करावा लागला.” न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डोलने पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजला सांगितले की, “पाकिस्तानमध्ये राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे आहे. मला बाहेर जाऊ दिले नाही कारण बाबर आझमचे चाहते माझी वाट पाहत होते. बरेच दिवस काहीही न खाता मला पाकिस्तानात राहावे लागले. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. पण देवाचे आभार मानतो की मी कसा तरी पाकिस्तानातून बाहेर पडू शकलो. मी त्याच्यावर टीका केली म्हणून ते चिडले होते.”

हेही वाचा: IPL2023, CSKvsRR: आर. अश्विनने घेतला भर मैदानात पंगा! मांकडिंग रनआऊटवर रहाणेचे सडेतोड उत्तर, Video व्हायरल

विराट कोहलीवरही साधला निशाना

विशेष म्हणजे सायमन डूल अनेकदा खेळाडूंवर आपली तिखट प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीबाबतही सायमन डूलने प्रश्न उपस्थित केले आहेत. “विराट कोहलीने सुरुवातीच्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी केल्याचे त्याने म्हटले होते पण ४२ ते ५० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने १० चेंडूंचा सामना केला. त्याची खेळी पाहता विराट आपल्या विक्रमासाठी खेळत असल्याचे दिसते. क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांना स्थान नाही.”