scorecardresearch

Premium

ODI WC 1983: लतादीदींचे भारतीय क्रिकेटवर आहेत खास ‘उपकार’, जाणून तुम्हीही कराल सलाम

Singer Lata Mangeshkar: भारतीय क्रिकेट संघाने सर्वात पहिल्यांदा १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषक विजेत्या संघावर आणि भारतीय क्रिकेटवर लता मंगेशकर यांचे खास उपकार आहेत.

Indian team won the World Cup for the first time in 1983
लता मंगेशकर आणि कपिल देव (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Lata Mangeshkar has made a special contribution to Indian cricket: आजच्याच दिवशी म्हणजेच ४० वर्षांपूर्वी, २५ जून १९८३ रोजी भारतीय क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. या दिवशी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून आपले नाव इतिहासाच्या पानात अमर केले होते. या विजेतेपदानंतर भारतात क्रिकेट हा धर्म बनला. याचे श्रेयही महान गायिका लता मंगेशकर यांनाही जाते. कसे ते जाणून घेऊया.

तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, पण लताजींनी भारतीय क्रिकेटसाठी काय केले हे जाणून तुम्हीही त्यांना सलाम कराल. लताजी या जगात नाहीत, पण त्यांचे हे उपकार क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहतील. खरं तर, टीम इंडियाने १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला, तेव्हा आजच्या परिस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडे त्या खेळाडूंना बक्षीस देण्यासाठीही पैसे नव्हते.

India captain Rohit Sharma gives clear message ahead of World Cup Said The team's goal is important
IND vs AUS, World Cup: विश्वचषकापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिला स्पष्ट संदेश; म्हणाला, “संघाचे ध्येय…”
Ajay Jadeja Indian legend who played 196 ODI matches joined the Afghanistan team agreement signed for the World Cup 2023
World Cup 2023: १९६ एकदिवसीय सामने खेळणारा ‘हा’ भारतीय दिग्गज अफगाणिस्तान संघाचा झाला मार्गदर्शक, विश्वचषकासाठी केला करार
Indian women's cricket team won gold medal for the first time in Asian Games Smriti said We had tears in our eyes during the national anthem
Gold Medal: भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स मध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक; सामन्यानंतर स्मृती म्हणाली, “राष्ट्रगीतावेळी…”
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?

बीसीसीआय अध्यक्षांनी लतादीदींकडे मागितली होती मदत –

बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना पुरस्कार देण्याची इच्छा होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते थांबले होते. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साळवे यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांची मदत घेतली. लताजींनाही क्रिकेटची आवड होती. त्यामुळे त्याने बीसीसीआयला मदत करण्यासाठी हो म्हटलं. त्यानंतर भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये लता मंगेशकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – अदानी समूहाने ODI World Cup 2023 साठी सुरु केली ‘जीतेंगे हम’ मोहीम, कोण-कोण होते सहभागी? जाणून घ्या

लतादीदींनी एक पैसाही घेतला नाही –

लताजींची गाण्यांची ही मैफल प्रचंड गाजली आणि त्यातून २० लाख रुपयांची कमाई झाली. विशेष म्हणजे या गाण्यांसाठी लतादीदींनी बीसीसीआयकडून एक पैसाही घेतला नाही. त्यानंतर भारतीय संघातील सर्व सदस्यांना एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढले आणि त्यांनी कठोर परिश्रम केले आणि संघासाठी चांगले योगदान दिले. तेव्हा पासून भारतात क्रिकेटला एक धर्म म्हणून पाहिले जाऊ लागले.

खेळाडूंनी लताजींच्या सुरात सूर मिसळेले –

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली, पण ‘भारत विश्व विजेता’ हे गाणे चांगलेच गाजले. या गाण्याला संगीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले होते, तर त्याचे बोल प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार ‘इंदिवर’ यांनी लिहले होते. विशेष म्हणजे जेव्हा लता मंगेशकर स्टेजवर हे गाणे गात होत्या, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही मागून लताजींच्या सुरात सूर मिसळेले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Since1983 singer lata mangeshkar has made a special contribution to indian cricket vbm

First published on: 25-06-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×