सिंगापूर : दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन या आघाडीच्या भारतीय बॅडमिंटनपटूंनी सिंगापूर खुल्या स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुरुष दुहेरीत सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही आगेकूच सुरू ठेवली. एचएस प्रणॉयला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत जपानच्या रिको गुंजीला २१-९, २१-१२ असे पराभूत केले. पुरुष एकेरीत दुसर्या मानांकित कुनलावुत विदितसर्नने माघार घेतल्याने लक्ष्यला उपांत्यपूर्व फेरीत चाल मिळाली. पहिल्या गेममध्ये लक्ष्यने दोन गुणांची आघाडी घेतली. मात्र, कुनलावुतने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. प्रणॉयला चुरशीच्या लढतीत सिंगापूरच्या लोह कीन यूकडून १८-२१, २१-१६, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
पुरुष दुहेरीत सा्त्विवक-चिराग जोडीने ली झे हुइ आणि यांग पो सुआन जोडीला २१-१५, ११-२१, २१-१८ असे पराभूत केले.
