सिंगापूर : भारताच्या पीव्ही सिंधूला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणार्या आन से यंगकडून सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला कोरियाच्या यंगविरुद्ध दबावाखाली चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे सिंधूला १७-२१, १४-२१ असे पराभूत व्हावे लागले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच यंगने सिंधूला पुनरागमन करण्याची फारशी संधी दिली नाही. महिला एकेरीत लक्ष्यला चुरशीच्या लढतीत जपानच्या कोकी वातानाबेकडून १९-२१, २१-१५, १५-२१ अशी हार पत्करावी लागली.
पुरुष दुहेरीत भारताच्या चौथ्या मानांकित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या सात्विक-चिराग जोडीने मलेशियाच्या खाइ झिंग कांग आणि आरोन ताइ जोडीला १९-२१, २१-१७, २१-१३ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत भारताच्या जोडीसमोर अग्रमानांकित किम वोन हो आणि सेऊ सेऊंग जाए जोडीचे आव्हान असेल.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिषा क्रॅस्टो जोडीला उपांत्य फेरीत चाल मिळाली. उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या गेममध्ये तिसर्या मानांकित शेन टांग जीए आणि तो ए वेई जोडीने माघारू घेतली. भारतीय जोडीची गाठ जपानच्या युइची शिमोगामी आणि सयाका होबाराशी होईल.
